जिल्ह्यात शिवसेना- भाजपात पिकविम्यावरून श्रेयवादाची लढाई

राणा पाटील विरूध्द ओमराजे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप
Osmanabad Politics
Osmanabad PoliticsSaam Tv

कैलास चौधरी

उस्मानाबाद : मागील आठवड्यात औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाने शेतकऱ्यांना (farmers) दिलासादायक निर्णय दिला. जिल्ह्यात (district) २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचा पिकविमा (crop insurance) संदर्भातील हा निकाल होता. मात्र, आता यावरून जिल्ह्यात शिवसेना- भाजपात (Shiv Sena BJP) चांगलीच जुंपली आहे. त्यावरून श्रेयवाद चांगलाच पेटला असून आरोप (Allegations) प्रत्यारोप होत आहेत.

२०२० मध्ये जिल्ह्यात तुफान अतिवृष्टी झाली होती. यात त्यांना पीकविमा कंपनीकडून योग्यती नुकसानभरपाई मिळाली नव्हती. त्यामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकविम्या संदर्भात जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार २८७ शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. यामुळे राणाजगजितसिंह पाटील यांच्यावतीने याचिकाकर्ते प्रशांत लोमटे व शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याच संदर्भात मात्र भाजपाच्या आधी शिवसेनेच्या वतीने प्रविण जाधव व शेतकऱ्यांनी देखील याचिका दाखल केली होती.

हे देखील पाहा-

यावर न्यायालयाने पिकविमा कंपनीने ६ आठवड्यात ही भरपाई द्यावी असे आदेश देण्यात आले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र यासाठी आता दोन्ही गटाकडून श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातूनच राणाजगजितसिंह पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत कंपनीने ही नुकसान भरपाई न दिल्यास राज्यसरकारने ही मदत द्यावी, अशी मागणी करत राज्यसरकारवर हल्लाबोल केला आहे.

Osmanabad Politics
बलात्कार प्रकरणी कॉंग्रेस मंत्र्याच्या मुलाच्या अडचणी वाढ

राणा पाटील यांच्या या मागणीवरून जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर आक्रमक झाले आहेत. राणा पाटील हे कंपनीची एजंट असल्याचा आरोप करत जोरदार हल्ला चढविला आहे. तसेच खरीप २०२० च्या पिकविम्या संदर्भात शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्वात अगोदर पिकविमा कंपनी विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र राणा पाटील श्रेय घेत आहेत तसेच ऐकीकडे पिकविमा आमच्यामुळे मिळतोय, असे दाखवुन बॅनरबाजी करत आहेत. लोकांना मॅसेज पाठून मीच विमा मिळवला हे सांगत आहेत.

मात्र राणा पाटील आणि विमा कंपनी यांचे लागेबांधे असुन मोठा घोटाळा असल्याचा संशय राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. २०२० मध्ये तुफान अतिवृष्टी झाली होती. यामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना मदत स्वरूपात फुटकी दमडी देखील अद्याप मिळाली नाही. मात्र खंडपीठाच्या निकालावरून एकमेकांवर ती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, आणि या दोन्ही गटातील प्रमुख याचिका करते पडद्यामागे पडले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com