कौतुकाची थाप ! शेतकऱ्यांच्या मुलींनी तयार केले पेरणी यंत्र

शातील बळीराजाला नवतंत्रज्ञानाची गरज आहे. हीच बाब ओळखून अकोल्यातील ग्रामीण आणि शेतकऱ्यांच्या मुलींनी पेरणी यंत्र तयार केले आहे.
कौतुकाची थाप ! शेतकऱ्यांच्या मुलींनी तयार केले पेरणी यंत्र
शेतकऱ्यांच्या मुलींनी तयार केले पेरणी यंत्र जयेश गावंडे

अकोला: देशातील बळीराजाला नवतंत्रज्ञानाची गरज आहे. हीच बाब ओळखून अकोल्यातील ग्रामीण आणि शेतकऱ्यांच्या मुलींनी पेरणी यंत्र तयार केले आहे. हे पेरणी यंत्र जगात प्रथमस्थानी ही ठरले आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांना फायदा ही होत असून त्यांनी त्यामाध्यमातून पेरणीही केली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोण आहेत या मुली, त्यांना कशी कल्पना सुचली आणि त्यांनी जगात प्रथम क्रमांक कसा मिळविला ते आपण पाहूयात.

शेतकऱ्याला परवडेल असे तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे किंबहुना ते होत ही आहे. शेतकऱ्यांना सहज आणि जास्त कष्ट न करता पेरणी करता आली आहे. यावर संशोधन ही झाले आहे, होत ही आहे. असेच संशोधन येथील मनुताई कन्या शाळेत दहावीत शिकणाऱ्या आणि शहरालगत असलेल्या गावात राहणाऱ्या मुलींनी पेरणी यंत्र तयार केले आहे. एकच व्यक्ती हे यंत्र चालवू शकतो. त्यासाठी त्या शेतकऱ्यांला जास्त श्रम ही लागणार नाही. कमी वेळेत आणि कोणत्याही प्रकारचे पीक घेण्यासाठी हे पेरणी यंत्र फायदेशीर ठरते आहे.

शेतकऱ्यांच्या मुलींनी तयार केले पेरणी यंत्र
छोटा राजन विरोधात क्लोजर अहवालाला न्यायालयाकडून मान्यता

रिधोरा, सोमठाणा, भोड, खडकी, खडकी टाकळी, भौरद, अकोली खुर्द, अकोली बुद्रुक यासह दहा गावातील शेतकऱ्यांनी हे पेरणी यंत्र वापरले आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांना शारीरिक होणारा त्रास आणि मजूर न मिळण्याची कटकट ही राहिली नाही आहे. विशेष म्हणजे, पेरणीकरताना शेतकऱ्यांना बियाणे व्यवस्थित आणि बरोबर अंतरावर पडले पाहिजे याची चिंता वाटत होती. परंतु, या यंत्रामुळे शेतकऱ्यांना कुठलीच काळजी वाट नाही आहे. किती बी पडते हे या यंत्रातून कळते. तसेच बैलजोडी, ट्रॅक्टरची गरज शेतकऱ्यांना या यंत्रामुळे लागत नाही.

केआयटीएस या रोबोटिक्सचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या प्रमुख व मेन्टोर काजल राजवैद्य यांच्या कुशल नेतृत्वात व विजय भट्टड मार्गदर्शनात मुलींनी रोबोटिक्सचे अद्यावत प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून मुलींनी पेरणी यंत्र तयार केले. या यंत्राचे प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, पेरणी यंत्र कशाप्रकारे काम करते याची संपूर्ण माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांना दिली.

फ़र्स्ट या संस्थेने आयोजित केलेल्या फ़र्स्ट रोबोटीक्स स्पर्धेमधे भारतातून महानगरातील या मुलींची केआयटीएसच्या अँजेल ही एकच चमू निवडल्या गेली होती. महाअंतीम फेरिमधे 11 देशांमधून 3000 चमूपैकी उत्कृष्ट 20 चमूचे आविष्कार निवडल्या गेले होते. गेल्या 28, 29 जुनला ही ऑनलाइन ही स्पर्धा घेण्यात आली. ज्यात मुलींनी बनवलेल्या पेरणी यंत्राला नाविन्यपूर्ण प्रभावशाली प्रोजेक्ट अवार्ड मिळाला. त्यामूळे जगभरात महानगरातील या मुलींचे कौतुक केल्या गेले.

शेतकऱ्यांच्या मुलींनी तयार केले पेरणी यंत्र
क्या बात है! पठ्ठ्याने रिक्षात विसरलेली लाखाची बॅग केली परत

आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत नाव कमावणाऱ्या विद्यार्थिनी

गायत्री तावरे, स्नेहल गवई, अंकिता वाजिरे, अर्पिता लंगोटे, निकिता वसतकर, रुचिका मुंडाले, सायली वाकोडे, प्रणाली इंगळे, गौरी गायकवाड, नेहा कवळकार, पूजा फुरसूले, स्वाती सरदार, सानिका काळे, आचल दाभाडे, दिया दाभाडे, गौरी झांबरे, प्रांजली सदाशिव समवेत तंत्र सहायक रुषभ राजवैद्य यांचा समावेश आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com