लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा; ९७ टक्के क्षेत्रावर झाल्या पेरण्या

सोयाबीनचा ४ लाख ८५ हजार ८६२ हेक्टवर पेरा झाला आहे.
Latur News
Latur NewsSaam Tv

लातूर - जिल्हयात गेल्या दोन आठवडयात संततधार पाऊस झाला होता. त्यामुळे खरीपांच्या खोळंबलेल्या पेरण्या वेग येऊन त्या आता अंतिम टप्यात आल्या आहेत. लातूर (Latur) जिल्हयात आजपर्यंत ४९७.५० मि.मी. पाऊस झाला आज पर्यंत ५ लाख ८२ हजार २०७ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा ४ लाख ८५ हजार ८६२ हेक्टवर पेरा झाला आहे.

हे देखील पाहा -

जिल्हयात सरासरी ७९१.६० मिलीमिटर पाऊस पडतो. पावसाची सरासरी पाहता आजपर्यंत ४९७.५० मिलीमिटर पाऊस झाला आहे. या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी चाढवावर मूठ 'धरली. लातूर जिल्हयात ६ लाख ३६ हजार ४० हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. जिल्हयात कमी- जास्त स्वरूपात पाऊस पडत आहे. या पावसाच्या आधारावर ५ लाख ८२ हजार २०७ हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या आहेत.

Latur News
धक्कादायक! पुलावर दुचाकी उभी करत तरुणाने घेतली नदीत उडी; शोध सुरु

यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा ४ लाख ८५ हजार ८६२ हेक्टवर झाला आहे. त्या खालोखाल तुरीचा ६८ हजार ८१७ हेक्टरवर, मूगाचा ६ हजार ७१ हेक्टरवर, उडीदाचा ४ हजार १० हेक्टरवर साळीचा १७२ हेक्टरवर ज्वारीचा ६ हजार ३८७ हेक्टरवर १६५ हेक्टरवर बाजरी, मकाचा २ हजार ४८६ हेक्टरवर, तीळ ३०४ हेक्टरवर, भुईमूग २९८ हेक्टरवर, कारळ १८९ हेक्टरवर, तर १५ हेक्टवर सुर्यफुलाचा पेरा झाला आहे. तसेच ६ हजार १९१ हेक्टरवर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com