सोयाबीनला येणार अच्छे दिन! ; भावात वाढ होण्याची शक्यता

गत वर्षी शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला त्यात दुप्पट भाव जास्तीचा मिळाला आहे.
सोयाबीनला येणार अच्छे दिन! ; भावात वाढ होण्याची शक्यता
सोयाबीनला अच्छे दिन, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमीSaam Tv

लातुर: मागील काळात सोयाबीनचे (Soyabean Rate) दर 10 हजाराच्या पेक्षा जास्त होते, पण सध्याला सोयाबीन बाजारात येत असताना आणि आयात सोयाबीनची आवक होत असताना भाव साडेचार हजार रुपयांवर आलेला आहे. यावर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी आहे आणि आगामी काळात भाव वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असल्याने सोयाबीन पिकाला अच्छे दिन येणार आहेत. लातुरची सोयाबीनचं कोठार अशी ओळख आहे. पण गत वर्षी आणि चालू वर्षी निसर्गाच्या प्रकोपामुळं सोयाबीनचे पीक संकटात आलं पण चालू वर्षी सुध्दा उत्पादन कमी आल्याने शेतकरी बाजारात विक्रीसाठी सोयाबीन आणत असून आता 5 पाच हजार पाचशे भाव झाला आहे.

 सोयाबीनला अच्छे दिन, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
बंगळुरूच्या कृषी मेळाव्यात 1 कोटीचा बैल; बैलाचे विर्य विकते हजारात

गत वर्षी शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला त्यात दुप्पट भाव जास्तीचा मिळाला आहे. लातुर कृषी उत्पन्न बाजार समितीने 18 तारखेपासून शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. आजतागायत 4 कोटी 15 लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप केले आहेत आणि 10 कोटी रुपयांची मंजुरी देऊन ठेवली असून शेतकऱ्यांना वाटप करणे सोईचे होणार आहे. केवळ 48 तासात शेतकऱ्यांना खात्यात पैसे देण्यासाठी सोय केली असून मुरुड आणि लातुर इथे 6 हजार मेट्रिक टन क्षमता असून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललित भाई शहा यांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com