राज्यात सर्वत्र पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

कोकणामधील बहुतांश भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे.
राज्यात सर्वत्र पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा
राज्यात सर्वत्र पाऊस; शेतकऱ्यांना दिलासाSaam Tv

पुणे : कोकणामधील बहुतांश भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. खरिपामधील पिकांना या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे. पिकांची वाढ जोमदारपणे दिसून येत आहे. कोकणामध्ये होत असलेल्या या पावसाने धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे.

काही भागात आंबा आणि काजू पिकांचे नुकसान देखील थोड्या प्रमाणात झाले आहे. मागील आठवड्यापासून कोकणामध्ये चांगलाच मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस देखील झाला आहे. पालघरमधील जव्हार ११७, मोखेडा १०६.२, विक्रमगड १३० या ठिकाणी वाडा ११४ मिलिमीटर पाऊस पडले आहे. रायगडगमधील माथेरान या ठिकाणी ११३.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

हे देखील पहा-

रत्नागिरीत राजापूर १३५, रत्नागिरी ११२.९, संगमेश्‍वर १५७, जयगड १४५, आणि चिपळूण या ठिकाणी १०४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सिंधुदुर्ग येथील वैभववाडीत १५७ मिलिमीटर तर ठाण्यातील शहापूर या ठिकाणी १०६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आणि कोकणातील धरणामधील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रामधील कोल्हापूर, नाशिक, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर चांगलंच होता. पूर्व भागामध्ये देखील पावसाची काहीशी संततधार सुरू होती.

राज्यात सर्वत्र पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा
महिला कृषी सहाय्यकाने ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांना दाखवली पेरणीची प्रात्यक्षिके

साताऱ्यामधील महाबळेश्‍वर १६४, कोल्हापुरातील गगनबावडा १४९ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. काही ठिकाणी हलका आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला आहे. यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या, पिकांना चांगलीच नवसंजीवनी मिळाली आहे. खानदेशामध्ये देखील पावसाचा जोर नसला, असला तरी काही ठिकाणी थोड्याशा शिवकावा झाला आहे. नगर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात देखील पावसाच्या तुरळक सरी बरसले आहेत. यामुळे सुकत असलेल्या पिकांना काहीसा आधार मिळाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com