लातुरात गुणकारी, अतिदुर्मीळ पिवळा पळस शोधण्यात यश !

महाराष्ट्र उदयगिरीत जैवविविधतेतील नामशेष होणाऱ्या वनस्पतींचे होतेय जतन, संवर्धन !
लातुरात गुणकारी, अतिदुर्मीळ पिवळा पळस शोधण्यात यश !
दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर: जैवविविधतेतील बहुगुणी, नामशेष अथवा लुप्त होत जाणाऱ्या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रकल्प उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राबविला जात आहे. विशेष म्हणजे गुणकारी, अतिदुर्मीळ पिवळा पळस शोधण्यात यश आले आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या असिस्टंट टू बॉटनिकल गार्डन योजनेंतर्गत दुर्मीळ वनस्पती, बीजांचे जतन करण्यास प्रोत्साहन दिले जाते. वनस्पती उद्यान विकसित करणाऱ्या योजनेसाठी राज्यात दोनच महाविद्यालयांची निवड झाली असून, त्यात उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रा. जयप्रकाश पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परिसरात वनस्पती उद्यान उभारून अनेक दुर्मीळ वनस्पतींचे जतन केले जात आहे.

लातुरात गुणकारी, अतिदुर्मीळ पिवळा पळस शोधण्यात यश !
दाऊद इब्राहीमचा हस्तक सलीम फ्रुट 'एनआयए'च्या ताब्यात

दरम्यान, केंद्रीय पथकाच्या पाहणीत पिवळ्या पळसाची कमतरता जाणवली. दुर्मीळ पिवळा पळस मराठवाड्यात सापडेल, असे पथकाने महाविद्यालयाकडून शोध सुरू झाला. निदर्शनास आणून दिल्यानंतर तालुक्यातील हेर गावाजवळील जायभायाचीवाडी येथे पिवळ्या पळसाचे झाड आढळून आले. अत्यंत औषधी गुणयुक्त पिवळ्या व पांढऱ्या पळसाचे वर्णन जमिनीवरचे सोने म्हणून केले गेले आहे. त्यात अनेक आजार दूर करणारे गुण आहेत.

हे देखील पाहा-

डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी पिवळ्या पळसातील औषधी गुण हेरून त्याचे बीज मिळवून त्यापासून रोपे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पिवळ्या पळसामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, मूतखडा, बाळंतपणानंतर स्नायूंना बळकट करण्याची क्षमता आहे. तसेच अतिसार, अंगदुखीसह अन्य आजार, दुखण्यांमध्ये पळसाचे घटक उपयोगी ठरतात पिवळ्या पळसाचा डिंकही अत्यंत गुणकारी मानला जातो. अशा जैवविविधतेतील बहुगुणी नामशेष अथवा लुप्त होत असलेल्या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रकल्प प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी व त्यांच्या सहकान्यांनी राबविला आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या वतीने योजनेतंर्गत विजांचे जतन करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.