'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांची धरपकड; आक्रमकतेनंतर सुटका

पाेलिसांनी राष्ट्रीय राजमार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.
farmers protest near jintur-parbhani highway
farmers protest near jintur-parbhani highway

परभणी : जिंतूर रोड वरील मौजे-नादापुर पाटीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने swambhimani shetkari sanghatna रास्ता रोको करण्यात आला. सोयाबीनचे पडते भाव आणि जिल्ह्यात मंजूर झालेला पीक विमा जिल्हाधिकारी यांनी कंपनीला आदेश देऊनही दोन महिने झाले तरी पीक विमा कंपनी त्या आदेशाला जुमानत नसल्याने हे आंदाेलन छेडण्यात आले. एकीकडे पीक विमाचे कोट्यावधी रुपये कंपनीकडे थकीत असून शेतकऱ्यांची वीज मात्र वितरण कंपनी तोडणीचे सत्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी आता शेती करायची कशी असा प्रश्न विचारुन झालेल्या अन्याया विराेधात आज परभणी- जिंतूर (parbhani-jintur) राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. farmers protest against reliance insurance company

farmers protest near jintur-parbhani highway
स्वच्छ सर्वेक्षणात पाचगणी, क-हाड अव्वल; ७ शहारांना ३ स्टार

हे आंदोलन सुरु होताच पंधरा मिनिटांनीच पोलिसांनी दडपशाही करून आंदोलकांना ताब्यात घेतले. ह्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, पक्ष जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष गजानन तुरे, दूध संघाचे रामप्रसाद गमे, बाळासाहेब घाटोळ, सुशील रसाळ, मुंजाभाऊ लोंढे, केशव आरमळ, गणपत रसाळ, अक्षय रसाळ,बाळासाहेब रसाळ ,राम रसाळ, अच्युत रसाळ, माऊली बोर्डीकर, वजीर दगडू,विजयकुमार, विष्णू, सागर, रावजी ,अशोक रसाळ, श्रीकांत आखे संतोष लांडगे ,शंकर रसाळ ,धनंजय ,दासराव रसाळ ,लक्ष्मण रसाळ, मदन लांडगे, बापूसाहेब रसाळ ,मुंजा भालेराव शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परभणी- जिंतूर राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर काही वेळाने कार्यकर्त्यांची सुटका करुन पाेलिसांनी राष्ट्रीय राजमार्ग वाहतुकीसाठी खूला केला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com