बीडमध्ये साखर आयुक्तांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा थेट ऊसाच्या फडात

ऊस प्रश्नांवरून शेतकरी संघर्ष समितीचं अनोखं आंदोलन...
Beed
Beed Saam TV

बीड: साखर कारखानदारांच्या मनमानी कारभाराविरोधात, ऊस प्रश्नावरून शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. बीडच्या आनंदगावमध्ये साखर आयुक्तांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा थेट ऊसाच्या फडात काढत, शेतकरी संघर्ष समितीने अनोखे आंदोलन केल आहे. बीड जिल्ह्यात (Beed District) अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनत चाललाय.

मात्र साखर कारखानदार मनमानीपणा करत आहेत, मनाला वाटल त्याचा ऊस घेऊन जात आहेत. आणि त्यामुळेच हिंगणगावमध्ये नामदेव जाधव या शेतकऱ्याने ऊसाचा फड पेटवून देत गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे ही आत्महत्या नसून खून आहे. त्यामुळे साखर आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी केलीय.

माजलगाव तालुक्यात 3 कारखाने आहेत, मात्र ते देखील शेतकऱ्यांचा ऊस लवकर घेऊन जात नाहीत. आज हार्वेस्टर लावायचं म्हणलं तर 20 हजार रुपये द्यावे लागतात, पैसे दिल्याशिवाय कोणी उस घेऊन जात नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट ओढवले आहे. मात्र साखर आयुक्त याकडे दुर्लक्ष करत असून साखर कारखानदारचं पोहोचण्याचे काम साखर आयुक्त कार्यालयाकडून होत आहे.

त्यामुळे या सर्वांचा निषेध म्हणून आम्ही उसाच्या फडात साखर आयुक्तांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन केल आहे. त्यामुळे आता तरी कारखानदारांनी, साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर घेऊन जावा. अन्यथा उग्र आंदोलन करू. असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com