Turmeric Price : मुहूर्ताच्या हळद सौद्यात उत्पादक शेतकऱ्याची चांदी; प्रति क्विंटलला मिळाला दणदणीत भाव

शेतक-यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
Sangli, Turmeric Price
Sangli, Turmeric Pricesaam tv

Sangli Market Yard : सांगली मार्केट यार्डात (sangli market yard) मंगळवारी नवीन हळदीच्या सौद्यास प्रारंभ झाला. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये 862 पोती राजापुरी हळदीची (turmeric) आवक झाली. त्यास प्रति क्विंटल 10 हजार 100 रुपये ते सात हजार 500 रुपये दर मिळाला आहे. (Breaking Marathi News)

Sangli, Turmeric Price
Cotton Price Per Quintal : कापसाचा दर वाढला, उत्पादकांत चैतन्य; जाणून घ्या प्रतिक्विंटलला मिळणारा भाव

पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. भविष्यातही दर तेजीत असेल असा व्यापाऱ्यांनी (traders) अंदाज वर्तविला आहे. जिल्हा उपनिबंधक महेश सुरवसे व सचिव महेश चव्हाण यांच्या हस्ते हळदीचा सौदा काढण्यात आला.

Sangli, Turmeric Price
Refinery Project : हे जाळून टाकू, तिकडे ताेडफाेड करु.. भाषा थांबवा अन् चर्चेला या : उदय सामंत

यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, अडत संघटनेचे अध्यक्ष अमर देसाई, हळद खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष सतीश पटेल, गोपाळ मर्दा, मनोहर सारडा आदी उपस्थित होते. हळद सौद्यामध्ये तासगाव (tasgoan) येथील पेड येथील शेतकरी (farmer) विनोद शेंडगे यांच्या राजापुरी हळदीला प्रति क्विंटल 10 हजार 100 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com