शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी येणार PM Kisan निधीचा 11 वा हप्ता

मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना तयार केल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी येणार PM Kisan निधीचा 11 वा हप्ता
PM Kisan Yojana Latest Marathi News, PM Kisan Yojana 11th Installment Saam Tv

वृत्तसंस्था: मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी (farmers) अनेक योजना तयार केल्या आहेत. यापैकी एका योजनेचे नाव किसान सन्मान निधी योजना (PM किसान योजना) आहे. या योजनेअंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना (farmers) दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. म्हणजेच ३ हप्त्यांमध्ये २ हजार रुपये दिले जातात. (PM Kisan Yojana Latest Marathi News)

आतापर्यंत १० हप्त्यांचे पैसे सरकारने पीएम किसान योजने (PM Kisan Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना दिले आहेत, अशा परिस्थितीत शेतकरी ११ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाऊ शकतात. एप्रिल महिन्यात हप्त्याचे पैसे येतील, अशी अपेक्षा होती. मात्र आता मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवता येणार आहेत.

हे देखील पाहा-

अशा प्रकारे पाठवले जातात पैसे...

एप्रिल-जुलैचा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलैच्या दरम्यान,

ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर,

डिसेंबर-मार्चचा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च या दरम्यान पाठविला गेला.

PM Kisan Yojana Latest Marathi News, PM Kisan Yojana 11th Installment
फॉरेनची पाटलीन ! श्रीलंकेचं वऱ्हाड गोंदियामध्ये !

आता 31 मे पर्यंत ई-केवायसी करा

हे उल्लेखनीय आहे की पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. जर एखाद्याने ई-केवायसी केले नसेल तर तो योजनेच्या पैशापासून लांब राहू शकणार आहात. सरकारने शेवटची तारीखही वाढवली आहे. आता शेतकरी 31 मे 2022 पर्यंत ई-केवायसी करू शकतात.

PM किसान टोल फ्री क्रमांक: १८००११५५२६६

- PM किसान हेल्पलाइन नंबर: १५५२६१

- PM किसान लँडलाइन क्रमांक: ०११-२३३८१०९२, २३३८२४०१

- PM किसानची नवीन हेल्पलाइन:०११-२४३००६०६ PM

किसान आयडी- अधिक मदत-pmkisan-ict@gov.in

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.