मेहेकर ते सिंदखेडराजाला जोडणारा पुल गेला वाहून; खासदारांनी केली पाहणी

शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार प्रतापराव जाधव यांनी जाऊन भेट घेवून शेतकऱ्यांना धीर दिला.
मेहेकर ते सिंदखेडराजाला जोडणारा पुल गेला वाहून; खासदारांनी केली पाहणी
मेहेकर ते सिंदखेडराजाला जोडणारा पुल गेला वाहून; खासदारांनी केली पाहणीसंजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा - आज सिंदखेडराजा व मेहकर तालुक्यातील सवडद, मोहाडी, आमखेड, हिवरखेड,अंबाशी शिवारामध्ये ढगफुटी व अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या Farmer बांधावर खासदार प्रतापराव जाधव Prataprao Jadhav यांनी जाऊन भेट घेवून शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच मधला मार्ग सिंदखेडराजा ते मेहेकरला जोडणारा एकमेव पुल वाहून गेल्याने ये जा करणाऱ्यांची पंचायत झाली आहे. पुल त्वरित दुरस्ती करुण देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खासदारांनी जिल्हा परिषेद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियणत्याला सूचना देऊन पुल १५ दिवसात तयार करा असे आदेश दिले आहे.

हे देखील पहा -

येथील नदीकाठची दोन्ही बाजूला पेरलेली शेती खरडून गेली आहे. शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील माती वाहून गेली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बळीराजाचे नुकसान झाले आहे. तसेच आमखेड येथील तलाव प्रचंड पावसामुळे फुटला होता त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. नुकसान झालेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com