शेतकऱ्यांच्या मुळावर उठला बंधारा; उभ्या पिकांसह जमिनी गेल्या वाहून..!

आजपर्यंत आपण बंधारा पाहिजे म्हणून, मागणी करतांना ग्रामीण भागातील शेतकरी पाहिले असतील.
शेतकऱ्यांच्या मुळावर उठला बंधारा; उभ्या पिकांसह जमिनी गेल्या वाहून..!
शेतकऱ्यांच्या मुळावर उठला बंधारा; उभ्या पिकांसह जमिनी गेल्या वाहून..!विनोद जिरे

बीड: आजपर्यंत आपण बंधारा पाहिजे म्हणून, मागणी करतांना ग्रामीण भागातील शेतकरी पाहिले असतील. मात्र आज आम्ही आपल्याला, आम्हाला बंधारा नकोय, नदीवर बांधलेला बंधारा काढून टाका. अशी मागणी करणाऱ्या दुष्काळी बीड जिल्ह्यातील, आम्ला गावच्या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणार आहोत. नेमकी अशी मागणी का करत आहेत शेतकरी ? कोण आहे याला जबाबदार ? काय आहेत या शेतकऱ्यांच्या व्यथा ? हे आपण सविस्तर पाहुयात

ही गोष्ट आहे, दुष्काळी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असणाऱ्या आम्ला गावची. या गावातील लोकांना बंधारा नको आहे. या मागणीला कारणही तसंच आहे. बंधारा म्हटलं की त्याचा फायदा बंधारा लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला होतो. कारण बंधाऱ्याच्या माध्यमातून आडवलं जाणारं पाणी यामुळे बंधाऱ्यालगत असणाऱ्या शेतातील विहिरींना आणि बोरला उन्हाळ्यात देखील काहीशा प्रमाणात पाणी राहतो. यामुळे हा बंधारा शेतकऱ्यांना हवाहवासा वाटतो. मात्र याला या गावातील शेतकरी या मागणीला अपवाद ठरत आहेत.

शेतकऱ्यांच्या मुळावर उठला बंधारा; उभ्या पिकांसह जमिनी गेल्या वाहून..!
तब्बल 50 माेबाईल चाेरणारा सातारा पाेलिसांच्या जाळ्यात

या गाव शिवारातून खराडी नावाची नदी आहे. या नदीवर पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून, कोल्हापुरी स्वरूपाचा बंधारा, गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी बांधलेला आहे. या बांधलेल्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणं तर लांबच, उलट या बंधाऱ्या लगत असणाऱ्या, जळपास 20 शेतकऱ्याच्या, 20 ते 25 एक्कर शेतीला याचा फटका बसतोय. शेतीसह उभी पिकं वाहून जात आहेत. या बंधाऱ्याला व्यवस्थित दारं नसल्याने आणि नदीतून वाहून आलेले सरपण, कस्तान, बंधाऱ्याला आडलं जातं आणि यामुळे हा बंधारा तुंबून, नदीचं पात्र बऱ्याच ठिकाणी फुटल्याने, हे पाणी या शेतकऱ्यांच्या शेतीत गेले आणि पूर्ण पिकांसह शेत वाहून गेलं आहे. यामुळं या शेतकऱ्याचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे.

तर याविषयी वृद्ध शेतकरी सांगता आहेत, की या बंधाऱ्याला वेशी बारीक आहेत. त्यामुळं फुरसाण अडकलं की पाणी तुंबून शेतात येतंय. याची तक्रार पाटबंधारे विभागाकडे केलीय मात्र कुनीचं आलं नाही. आणखीन पावसाळा भरपूर राहिलाय. काय पिकणार आहे यात ? काय पेरायचं यात ? अजून पाणी आलं की पुन्हा वाहून जाणार. या बंधाऱ्यापासून आम्हाला काहीचं उत्पनं नाही. त्यामुळं हा बंधारा आम्हाला नको. नाहीतर घरात 6 माणसं आहेत. आम्ही सगळे त्या ऑफिसमध्ये जाऊन औषध प्राशन करून जीवन संपवू. नाहीतर पुन्हा पाणी आलं तर या बंधाऱ्यात उडी मारून जीव देऊ. असा संतप्त टोकाचा इशारा वृद्ध शेतकरी तुकाराम अंधारे यांनी दिला आहे.

दुसरे शेतकरी म्हणाले की हा बंधारा आम्हाला नकोय सहा वर्षापासून मी प्रत्येक वर्षी याविषयी तक्रार करतोय सगळे शेत वाहून गेले आहे. आज कुटुंब कसा सजवावा आत्ताच अभियानाला वीस हजार रुपये दिलेत पुन्हा आणखीन वीस हजार रुपये आणायचे कुठून आमची मागणी मान्य न केल्यास आम्ही आत्मदहन करू जवळपास या ठिकाणच्या पंचवीस ते तीस शेतकऱ्यांचं नुकसान आहे सरकारने आमच्या नुकसानीची भरपाई करून द्यावी अशी मागणी संजय अंधारे या शेतकऱ्यांनी केली आहे.

या बंधाऱ्याला पाणी आलं की हा बंधारा तुंबला जातो आणि त्यामुळे शेतात पाणी घुसतय. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले, त्याचबरोबर नदीच्या कडेने बारीक आंब्याचे झाड लावले होते, ते देखील वाहून गेले आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, मूग या पिकांचे नुकसान झालंय. पाच ते सहा वर्षांपासून ऑफिसला कळवत आहोत. मात्र याची दखल घेत नाहीत. त्यामुळे हा बंधारा आम्हाला नकोय. आमच्या नुकसानीची भरपाई करून द्यावी. पेरणीसाठी पैसे नव्हते, मात्र मी सावकाराकडून कर्ज काढून पेरणी केली. आता पिकांचे खूप नुकसान झाले आहे त्यामुळं शेतात नांगर ओढावा लागला. आता परत पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे आता पैसे आणावे कुठून ? शेतात टाकण्यासाठी मातीला पैसे नाहीत. आम्ही जगायचं कसं ? घरातील लेकीबाळीचे लग्न करायचे कुठून ? कसा चालणार आमच्या संसाराचा गाडा ? असा सवाल शेतकरी राजेभाऊ अंधारे यांनी केलाय.

शेतकऱ्यांच्या मुळावर उठला बंधारा; उभ्या पिकांसह जमिनी गेल्या वाहून..!
घरकुलासाठी महापालिकेच्या प्रवेश द्वाराचे कुलूप फोडून मोर्चेकरांचा हल्लाबोल

दरम्यान गेल्या चार ते पाच वर्षांपासून, या बंधाऱ्या विषयीच्या तक्रारी घेऊन, शेतकरी पाटबंधारे विभागाकडे जात आहेत. मात्र या पाटबंधारे विभागाच्या गलथान आणि बेजबाबदार कामामुळे या शेतकऱ्यांच्या पिकांसह शेती वाहून जाण्याची दुर्दैवी वेळ ओढावत आहे. यामुळे हे दरवर्षीच नुकसान सहन होत नसल्याने, या नुकसानग्रस्त वृद्ध शेतकऱ्याने, कुटुंबातील व्यक्तींसह विषारी औषध प्राशन करून किंवा या बंधाऱ्यात पुन्हा पाणी आल्यानंतर बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या करू. असा संतप्त आणि टोकाचा इशारा दिला आहे. यामुळे आतातरी या निगरगट्ट आणि बेजबाबदार पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना, जाग येणार का ? आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का ? हेच पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com