भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने कांदा मोफत वाटला; नागरिकांची झुंबड

मोफत कांदे देत असल्याचे कळताच अवघ्या काही मिनिटांत कांदे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड
Onion
OnionSaam Tv

बुलढाणा - कांद्याला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेगावच्या (Shegaon) एका शेतकऱ्याने २०० क्विंटल कांदा मोफत कांदा वाटप केले. कैलास नारायण पिंपळे असे या हतबल शेतकऱ्याचे नाव असून तो शेगावचा रहिवाशी आहे.

कांद्याला (Onion) भाव नसल्याने शेतातून तो बाजार समितीपर्यंत आणण्याचा खर्च देखील कांदा उत्पादनातून मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या कांद्याने शेतकऱ्यांना रडविल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी शेगाव शहरातील माळीपुरा परिसरात मोफत कांदा वाटप आंदोलन करुन शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कैलास नारायण पिंपळे असे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपला कांदा खामगाव आणि शेगावच्या बाजारात नेला होता.

हे देखील पाहा -

मात्र भाव तर सोडाच सदर कांदा कुणी घ्यायलाही तयार नसल्याने शेतकऱ्याने हतबल होऊन हा कांदा पार्ट आपल्या घरी आणला. कांदा पडून- पडून खराब होईल म्हणून शेतकरी पिंपळे यांनी सादर कांदा घेऊन जाण्यासाठी नागरिकांना आवाहन केले.मोफत कांदे देत असल्याचे कळताच अवघ्या काही मिनिटांत कांदे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

Onion
धक्कादायक! पबजी खेळण्यात गुंतला अन् थेट इमारतीवरून खाली पडला

कांद्याला भाव नसल्याने शेतातून तो बाजार समितीपर्यंत आणण्याचा खर्च देखील कांदा उत्पादनातून मिळत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या कांद्याने शेतकऱ्यांना रडविल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यां मोफत कांदा वाटप आंदोलन करुन शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com