12 वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला साखर कारखान्याचा भोंगा यंदा वाजणार!

या साखर कारखान्याचा 2002 साली पहिला चाचणी गाळप हंगाम घेण्यात आला होता.
12 वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला साखर कारखान्याचा भोंगा यंदा वाजणार!
12 वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला साखर कारखान्याचा भोंगा यंदा वाजणार!भारत नागणे

पंढरपूर : दुष्काळी सांगोला (Sangola) तालुक्यासाठी वरदान ठरलेला 'सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना' तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा सुरु होणार आहे. थकीत कर्जाच्या वसुली साठी राज्य सहकारी बॅंकेने (State Co-operative Bank) ताब्यात घेतलेला हा कारखाना धाराशिव साखर उद्योग समुहाला 25 वर्षाच्या मुदतीने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात आला आहे. त्यानुसार धाराशिव साखर उद्योग समुहाने कारखाना ताब्यात घेतला असून गाळप हंगाम सुरु करण्याच्या दृष्टाने तयारी सुरु केली आहे.( The Sangola sugar factory is set to reopen after 12 years)

हे देखील पहा-

या साखर कारखान्याचा 2002 साली पहिला चाचणी गाळप हंगाम घेण्यात आला होता. त्यानंतर सततचा दुष्काळ आणि चुकीच्या व्यवस्थापनामुळे (management) कारखाना आर्थिक गर्तेत डकला होता, पुढे दोन ते तीन गाळप हंगामांचा अपवाद वगळता आता पर्यंत कारखाना सुरु करणे शक्य झाले नाही. त्यामुळे एका तपाहून अधिक काळ हा साखर कारखाना बंदच आहे. तर दुसरीकडे राज्य सहकारी बॅंकेचे कर्ज, त्यावरील व्याज, कामगारांचे थकीत वेतन आणि शेतकर्यांची FRP ची रक्कम असे मिळून सुमारे 160 कोटी रुपये थकीत कर्ज आहे.

थकबाकी वुसलीसाठी राज्य सहकारी बॅंकेने हा साखर कारखाना ताब्यात घेतला होता. राज्य सरकारने सहकारी (State Goverment) साखर कारखान्यांची विक्री न करता ते भाडेत्त्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्यण घेतला आहे. त्यानुसार राज्य सहकारी बॅंकेने राज्यातील डबघाईला आलेले 13 साखर कारखान्यांची निविदा काढून ते भाडेत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचा पहिला साखर कारखाना राज्य सहकारी बॅंकेने भाडेत्त्त्वार दिला आहे.

12 वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला साखर कारखान्याचा भोंगा यंदा वाजणार!
संपूर्ण FRP न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही!

येत्या 15 ऑक्टोबर (15 October) पासून यंदाचा गाळप हंगाम सुरु होणार आहे. त्यानुसार सांगोला साखर कारखाना सुरु कऱण्याचा निर्णय़ धाराशिव साखर उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी घेतला आहे. गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने सुमारे तीनशेहून अधिक कर्मचारी येथे दाखल झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेला हा कारखाना सुरु होणार असल्यामुळे परिसरातील आर्थिक चक्र पुन्हा फिरण्यास मदत होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com