राज्याला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकऱ्यांवर दुबार फवारणीचे संकट

कोल्हापूरसह, सातारा, सांगली, बीड जिल्ह्याला रात्रभर पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबई, हिंगोली, विदर्भात पावसामुळे काहीसा शिडकावा केला आहे.
राज्याला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकऱ्यांवर दुबार फवारणीचे संकट
राज्याला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकऱ्यांवर दुबार फवारणीचे संकटSaam Tv

कोल्हापूर : बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूरसह, सातारा, सांगली, बीड जिल्ह्याला रात्रभर पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबई, हिंगोली, विदर्भात पावसामुळे काहीसा शिडकावा केला आहे. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असला, तरी काढणीला आलेल्या पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे देखील पहा-

शेतकऱ्यांपुढे परत एकदा नवे संकट निर्माण झाले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात सायंकाळी सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत कोसळतच होता. पावसाने महाबळेश्वर मधील स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊसाच्या हजेरीमुळे झाडे, विजेचे खांब रस्त्यावर पडले आहेत, तर काही घरांची कौले उडून गेल्यामुळे संसार उघड्यावर पडले आहे.

लातूर, उस्मानाबाद, बीडमध्ये देखील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शिवारामध्ये पाणी साचल्यामुळे ऊसतोडणी देखील थांबवावी लागली आहे. थंडी गायब आणि तापमानात वाढ झाली आहे. पावसाचे ढग राज्यावर सतत दाखल होत असून, हवामान ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे थंडी परत एकदा गायब झाली आहे.

राज्याला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकऱ्यांवर दुबार फवारणीचे संकट
गुजरातमध्ये १२० कोटींचे ड्रग्ज जप्त: एटीएसची कारवाई

हवामान बदलांमुळे किमान तापमानमध्ये वाढ नोंदविण्यात येत आहे. राज्यावर आले असलेले आभाळ नाहीसे झाल्यावर परत थंडीला सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील २ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तमिळनाडकडे सरकत आहे. तर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत आहे. यामुळे हवामान विभागाने राज्यात आणखी २ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com