कृषी पपं चोरट्यांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले; तांब्याच्या वायरसाठी कृषी पपंची चोरी

कधी आस्मानी तर सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेकऱ्यांना अत्ता या कृषी पपंच्या चोरीचा सामना करावा लागत आहे.
Jalna News
Jalna Newsलक्ष्मण सोळुंके

जालना - जिह्यात दिवसेन दिवस कृषी पपंच्या चोरीच्याघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात कृषी पंपाची चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याने गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात ३०० हुन अधिक कृषी पंपाची (Agriculture Pump) चोरीच्या घटना घडल्या आहे. त्या पैकी ९० कृषी पपंच्या चोरीचे गुन्हे दाखल आहे. २० गुन्हाचा छडा लावण्यात पोलिसांना (police) यश आल आहे. चोरीच्या या घटनेमुळे शेकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. कधी आस्मानी तर सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेकऱ्यांना (Farmer) अत्ता या कृषी पपंच्या चोरीचा सामना करावा लागत आहे.

अंबड तालुक्यातील करंजळा गावात रात्री विदूत पपंची चोरी करून दुचाकी वरून घेऊन जात असताना गावकऱ्यांनी दोन चोरट्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्या नंतर विदूत पंपातील तांब्याच्या वायरसाठी ही टोळी कृषी पंपाची चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे देखील पहा -

करंजळा गावात शुक्रवारी रात्री चार शेतकऱ्याच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेच्या कृषी पपंची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे गावातील नागरिक सतर्क होते.आज रात्री नऊच्या सुमारास दोन जण दुचाकीवरून कृषी पपं गावच्या परिसरातून घेऊन जात असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी या चोरट्यांना पकडून चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळल्याने संतप्त गावकऱ्यांनी चोरट्यांना चांगलाच चोफ दिल्या नंतर आपण ही चोरी विदूत पंपातील तांब्याच्या वायरसाठी करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनेची माहिती गोदी पोलिसांना देऊन चोरी केलेले विदूत पपं आणि दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Jalna News
Goa Elections: प्रचार संपला तरी आरोप सुरूच! भाजपावर पैसे वाटपाचा आरोप

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कृषी साहित्याच्या चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यांतच कृषी पंपातील तांब्याच्या वायरला बाजारात चागली किंमत मिळत असल्याने जिल्ह्यात अनेक कृषी पपंच्या चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. दिवसा शेतकऱ्याच्या शेतात जाऊन टेहाळणी कराची आणि रात्री चोरी करायची असा धडाकाच या टोळ्यांनी लावला आहे. गुन्हा दाखल करताना पुरावा लागतो,मात्र अनेक शेतकऱ्याकडे बिल नसल्या कारणाने शेकऱ्यांना गुन्हा दाखल न करताच परतावे लागते. जे गुन्हे दाखल होतात त्यांचा तपास पोलीस करत नसल्याने या भरणीच्या वेळी ह्या चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com