आयडियाची कल्पना! डाळींबाच्या पिकाला नेसवली साडी; उन्हापासून रक्षणासाठी शेतकऱ्याचा जुगाड

farmer is wrapping saree around the pomegranate crop in Nashik : सध्या वाढत्या उष्णतेचा पिकांना मोठा फटका बसत असून उन्हाच्या तडाख्याने डाळींब पीक धोक्यात आलंय.
आयडियाची कल्पना! डाळींबाच्या पिकाला नेसवली साडी; उन्हापासून रक्षणासाठी शेतकऱ्याचा जुगाड
farmer is wrapping saree around the pomegranate cropअभिजीत सोनावणे

नाशिक : राज्यात उन्हाळा सुरु आहे. अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे. याची झळ शेतीलाही बसतेय. मात्र नाशिकमधील एका शेतकऱ्यानं उन्हापासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी भन्नाट आयडियाची कल्पना शोधली आहे. आपल्या शेतातील डाळिंबाच्या पिकाचं (pomegranate crop) उन्हाच्या तडाख्यापासून (Sun Heat) संरक्षण व्हावं यासाठी सुरेश निकम या नाशिकच्या दाभाडी (Dabhadi, Nashik) येथील शेतकऱ्यानं पिकांना चक्क साडीच (Sari) नेसवली आहे. केवळ पाच हजार रुपयांचा खर्च करत तब्बल ३०० पिकांना साडीचं आच्छादन देत उन्हापासून संरक्षण करण्याचा जुगाड या शेतकऱ्यानं केलाय. (To protect from the sun heat the farmer is wrapping saree around the pomegranate crop; a great idea of nashik farmer)

हे देखील पाहा -

सध्या वाढत्या उष्णतेचा पिकांना मोठा फटका बसत असून उन्हाच्या तडाख्याने डाळींब पीक धोक्यात आलंय. मात्र डाळींबाचं आगार समजल्या जाणाऱ्या मालेगावच्या दाभाडीचे डाळींब उत्पादक शेतकरी सुरेश निकम (Suresh Nikam) यांनी उन्हापासून पिकांच्या रक्षणासाठी आयडियाची कल्पना लढवलीय. निकम यांनी नामी शक्कल लढवत चक्क डाळींबाच्या झाडांना साड्यांचं आच्छादन पांघरलयं. स्थानिक बाजारपेठेतून त्यांनी 15 ते 20 रुपयांना जुन्या साडया विकत आणून त्यांच्या एक एकरातील 300 झाडांना साड्यांचं आच्छादन केलयं. यासाठी त्यांना अवघा 5 हजार रुपये खर्च आलाय. या देशी जुगाडामुळे (Desi Jugad) अगदी कमी खर्चात त्यांच्या डाळींब बागाचे उन्हापासून संरक्षण होतंय. सध्या निकम यांच्या या आयडियाच्या कल्पनेची सर्वत्र चर्चा होतेय.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com