आवक घटल्याने टोमॅटोने गाठली 'शंभरी'

सामन्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री बसणार
आवक घटल्याने टोमॅटोने गाठली 'शंभरी'
आवक घटल्याने टोमॅटोने गाठली 'शंभरी'Saam Tv

मुंबई - अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले पीक खराब झाले आणि त्यामुळे टोमॅटोची ( Tomato) आवक घटली आहे. आवक घटल्याने टोमॅटो किलोमागे 80 ते 100 रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे अगोदरच महागाईचा त्रास सहन कराव्या लागणाऱ्या सामन्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. नोव्हेंबर महिन्यात टोमॅटोचे दर तसे कमी असतात. मात्र, अवकाळी पावसामुळे टोमॅटोची आवक घटली आणि त्यामुळे टोमॅटोने शंभरी गाठली आहे.

हे देखील पहा -

गेले काही दिवस पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर येथे होणाऱ्या अवकाळी पावसामुळे टोमॅटोचा पुरवठा बाजारपेठेत कमी होताना दिसत आहे. यापुर्वी मुंबईत काही दिवसांपूर्वी टोमॅटो 80 रुपये किलोच्या जवळपास विकले जात होते पण, आता ते 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे.

आवक घटल्याने टोमॅटोने गाठली 'शंभरी'
निवृत्त ACP शमशेर पठान यांचे परमबीर सिंगांवर गंभीर आरोप; म्हणाले 26/11 मधील...

टोमॅटोचा वापर हा नेहमीच्या जेवणात केला जातो पण, तोही शंभरीपार गेल्याने अडचण येत आहे. अवकाळी पावसाचा परिणाम झाल्याने बंगळूरु येथून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणारी टोमॅटोची आवक थांबली आहे. तसेच नाशिक, सांगली येथूनही कमी प्रमाणात टोमॅटो येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com