ऐकावं ते नवलचं! हे ‘ब्रिमॅटो’चं रोप एकाचवेळी देतं टोमॅटो आणि वांगी

शेती अभ्यासक आणि संशोधक नवनवीन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत
ऐकावं ते नवलचं! हे ‘ब्रिमॅटो’चं रोप एकाचवेळी देतं टोमॅटो आणि वांगी
ऐकावं ते नवलचं! हे ‘ब्रिमॅटो’चं रोप एकाचवेळी देतं टोमॅटो आणि वांगीSaam Tv

नवी दिल्ली : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आज देखील आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. देशात शेती आणखी प्रगत आणि उत्पादनशील व्हावी, याकरिता शेती अभ्यासक आणि संशोधक नवनवीन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. विशेषत: भारतीय कृषी संशोधन परिषदेत शास्त्रज्ञ कायम काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात. वाराणसी मधील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ICAR शास्त्रज्ञांनी अशीच एक गोष्ट विकसित केली आहे.

कलम Grafting तंत्राद्वारे शास्त्रज्ञांनी अशी वनस्पती तयार केली आहे, ज्याला एकावेळेस टोमॅटो आणि वांगी लागत आहेत. त्यांनी या वनस्पतीला 'ब्रिमॅटो' Brimato असे नाव दिले आहे. वाराणसी मधील आयसीएआर आणि भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेने याअगोदर ग्राफ्टिंग पोमॅटो (बटाटा- टोमॅटो) एकत्र उत्पादन घेण्यात यश मिळवले होते. यानंतर, त्यांनी आता 'ब्रिमॅटो' ची झाडे विकसित केली आहेत. आयसीएआरने पाठविलेल्या निवेदनानुसार, २५ ते ३० दिवसांची वांग्याची रोपं आणि २२ ते २५ दिवसांची टोमॅटोची रोपे यांचं ग्राफ्टिंग करून ब्रिमॅटो ही नवीन जात तयार करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

या वांग्याच्या वाणातील सुमारे ५ टक्के रोपांमध्ये २ शाखा विकसित करण्याची प्रवृत्ती आहे. याचाच फायदा घेत स्प्लिस पद्धतीने कलम केले आहेत. मूळ वांगांच्या झाडाला तिरपा छेद देऊन त्यामध्ये टोमॅटोची फांदी बांधून ग्राफ्टिंग केल्यावर Grafting Technique रोपांना ५ ते ७ दिवस नियंत्रित वातावरणात ठेवण्यात आले आहे. नंतर ५ ते ७ दिवस त्यांना समप्रमाणात सूर्यप्रकाश आणि सावली दिली आहे. वाराणसी मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च मधील शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कलम केलेल्या वनस्पतींचे ग्राफ्टिंग १५ ते १८ दिवसांनी शेतात लावण्यात आले आहे.

ऐकावं ते नवलचं! हे ‘ब्रिमॅटो’चं रोप एकाचवेळी देतं टोमॅटो आणि वांगी
केंद्र आणि राज्य सरकार मध्ये सध्या टोळी युद्ध सुरू- राजू शेट्टी

वांगी Brinjals आणि टोमॅटोची Tomato संतुलित वाढ व्हावी. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात जास्त काळजी घेण्यात आली होती. शास्त्रज्ञांनी गरजेनुसार रोपाला खत दिले आहे. लावणीनंतर ६० ते ७० दिवसांनी एकाचे झाडाला टोमॅटो आणि वांगी लागली आहे. ब्रिमॅटोच्या एका झाडापासून २.३८३ किलो टोमॅटो आणि २.६४ किलो वांग्याचे उत्पादन मिळाले, अशी माहिती या शास्रज्ञांनकडून मिळाली आहे. मागील अनेक वर्षांपासून भाज्यांची आणि फळांची उत्पादकता वाढवण्याकरिता ग्राफ्टिंगचा वापर करण्यात येतो. भारतीयांकरिता एक तंत्र एकदम नवीन नाही.

परंतु, एकाचं झाडाला २ भाज्यांचे ग्राफ्टिंग करण्याची पद्धत अगदी अलीकडच्या काळात विकसित करण्यात आली आहे. जेणेकरून एकाच वनस्पतीपासून २ वेगळ्या प्रकारचे उत्पादन मिळू शकणार आहे. ग्राफ्टिंग तंत्रामुळे तयार केलेली वनस्पती कमी वेळेत आणि कमी जागेत जास्त भाजीपाला उत्पादन Vegetable Production देण्यात सक्षम आहे. जागेची कमतरता असलेल्या शहरी आणि उपनगरीय भागांनसाठी ही बाब अतिशय उपयुक्त ठरू शकणार आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. वाराणसी मधील आयसीएआर आणि आयआयव्हीआरमध्ये ब्रिमॅटोच्या व्यावसायिक उत्पादनावर संशोधन सुरू करण्यात आले आहे. कमी शेतजमीन असलेले शेतकरी आणि टेरेस गार्डनची हौस असलेल्या लोकांकरिता पोमॅटो आणि ब्रिमॅटो सारखी रोपे नक्कीचं फायदेशीर ठरणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.