तूर, ज्वारीवर अळीचा प्रादुर्भाव; रब्बी हंगामातही शेतकरी चिंतेत

रब्बी हंगाम नुकताच पूर्ण झाला आहे. परभणीत सरासरी तुलनेत 90 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
तूर, ज्वारीवर अळीचा प्रादुर्भाव; रब्बी हंगामातही शेतकरी चिंतेत
तूर, ज्वारीवर अळीचा प्रादुर्भाव; रब्बी हंगामातही शेतकरी चिंतेतSaam TV

परभणी : रब्बी हंगाम नुकताच पूर्ण झाला आहे. परिसरात सरासरी तुलनेत 90 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यातून खरिपाचे हाती आलेले पीक वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना आता हवामान बदलामुळे रब्बीतील ज्वारी पिकावर लष्करी अळी तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा जास्त असून दीड महिना ज्वारीची पेरणी उशिरा झाल्याने ज्वारीची वाढ खुंटली आहे. तर तुरीच्या शेंगा पोखरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरात खरीप हंगामातील पिके ऐन बहरात आलेली असताना सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या भीषण अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. परिसरात खरिपाचे पीक बाधित होण्याचे प्रमाण तसेच अनेक ठिकाणी पाणी साचून पिके पिवळी पडली, पाण्याखाली येऊन सोयाबीन कापूस आदी पिके हातची गेली. हे प्रचंड नुकसान सहन करून बळीराजा कसाबसा संकटातून सावरण्यासाठी रब्बी हंगामातील पेरणी पूर्ण करून रब्बी हंगामातील पिके चांगली येतील या आशेवर होता. रब्बी हंगाम तरी तारेल आणि आर्थिक संकटातून बाहेर निघू अशी आशा शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून जवळपास पेरणी पूर्ण केली.

मात्र गेल्या वीस दिवसापासून हवामान बदलामुळे थंडी गायब झाल्याने उरल्यासुरल्या तुरीच्या शेंगांना बहार असताना शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यामुळे मोठा फटका बसला तर रब्बी हंगामातील पेरलेली ज्वारीची पेरणी दीड महिना उशीर झाल्याने वाढ खुंटलली असून शेतकरी तूर फवारणी वर खर्च करत आहेत. पण अळीचा प्रादुर्भाव कमी होत नाही त्यामुळे उत्पादन कमी होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली जात आहे. क्रुषि विद्यापीठाने बांधावर येऊन मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com