Kokan: सहकारातून शेती; महिलांनी भाजीपाल्यातून मिळविले लाखाेंचे उत्पन्न

कोकणात ओस पडू लागलेली शेती अशा प्रकल्पामुळे नक्कीच पुन्हा बहरु लागेल असा विश्वास वाटताे.
Women Farmers In Mandavkhari
Women Farmers In Mandavkharisaam tv

रत्नागिरी : चिपळूण (chiplun) तालुक्यातील मांडवखरी (mandavkhari) येथील २० महिलांनी (women) एकत्र येत सहकारातून शेती (farming) हा उपक्रम राबविला आहे. या सर्वांनी एकजूटीतून केलेल्या शेतीतून विशेषत: भाजीपाला शेतीतून त्यांना जवळपास आठ लाखांचे उत्पन्न मिळाला आहे. या शेतीसाठी महिलांना दिशांतर या संस्थेची मोलाची साथ लाभली आहे. (ratnagiri latest marathi news)

ग्रामीण भागात एकेकाळी प्रमुख व्यवसाय असणा-या शेतीपासून माणूस दुरावात चालला आहे. शेतीकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता दिशांतर संस्थेने अन्नपूर्णा प्रकल्पाची निर्मिती केली. त्यासाठी चिपळूण तालुक्यातील मांडवखरी गावात प्रकल्प साकारायचं संस्थेने ठरविले. या कामाला कन्साई नेरोलक कंपनीने साथ दिली.

दहा एकरात राबविला प्रकल्प

दिशांतरचा अन्नपूर्णा प्रकल्प मांडवखरी गावात सुरु झाला. मांडवखरी येथील महिला स्वयंसहायता गटाची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. अन्नपूर्णा प्रकल्प हा २० अल्पभूधारक, भूमिहीन महिला शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसोबत राबवण्यात आला आहे. जवळपास १० एकरमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी कन्साई नेरोलेक पेंट्स लि. कंपनीने तीन वर्ष सातत्यपूर्ण निधी सहयोग उपलब्ध करून दिला.

Women Farmers In Mandavkhari
राष्ट्रपती राजवट लागली तरी जनतेला किंचितही वाईट वाटणार नाही : सदाभाऊ खाेत

गेल्या तीन वर्षापासून हा प्रकल्प सुरु झाला आहे आणि सामुहिक शेती, सहकारातून समृद्धीचा मार्ग मांडवखरी गावातील महिलांनी शोधला. विषमुक्त शेती सध्या या महिला करीत आहेत. या विषमुक्त शेती प्रकल्पामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता आले आहे. सहकारातून केलेल्या सामुदायिक शेतीतून प्रती कुटुंब वार्षिक सरासरी ४५ हजार रुपयांचे उत्पन्न वाढले आहे. परसबागेतून प्रती कुटुंब वार्षिक उत्पन्नात सरासरी ३५ हजार रुपयांची वाढ झाली तर अळंबी उत्पादनातून प्रती कुटुंब वार्षिक उत्पन्नात सरासरी ४७ हजार रुपयांची वाढ झाली. जिल्ह्यातील या अभिनव व यशस्वी प्रकल्पातून शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होण्यास मदत होत आहे. या एकुण प्रकल्पातून या महिलांना जवळपास आठ लाखाचं उत्पन्न मिळत आहे.

या प्रकल्पातून प्रेरणा घेऊन परिसरातील ५४ कुटुंबांनी अन्नपूर्णा प्रकल्पातील उपक्रम वैयक्तिक स्तरावर राबवायला सुरुवात केली. या प्रकल्पाने महिलांना केवळ आर्थिक समृद्धी नाही दिली तर कुटुंब आणि समाज स्तरावर निर्णय प्रक्रियेत सहभाग दिला. समाजात पत आणि प्रतिष्ठा दिली. कधी काळी अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकरी असलेल्या या महिलांना अन्नपूर्णा प्रकल्पाने एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे. त्यामुळे कोकणात ओस पडू लागलेली शेती अशा प्रकल्पामुळे नक्कीच पुन्हा बहरु लागेल असा विश्वास वाटताे.

Edited By : Siddharth Latkar

Women Farmers In Mandavkhari
Raj Thackeray Aurangabad Sabha: '...तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार'
Women Farmers In Mandavkhari
चर्चाच चर्चा! जुगार अड्ड्यावरील छाप्यात ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेले वाहन जप्त
Women Farmers In Mandavkhari
Shimgotsava: ढाेल ताशांचा गजर; शिमगोत्सवात महिलांनी नाचवली पालखी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com