
Buldhana APMC News : बुलढाणा जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळातून सभापती आणि उपसभापती पदाच्या नियुक्ती आज (मंगळवार) झाल्या. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने बाजी मारली. (Maharashtra News)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर (buldhana krushi utpanna bazar samiti) महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. बुलढाणा बाजार समितीवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत (jalindar budhwat) यांची सभापतीपदी निवड झाली.
या कृषी उत्पन्न बाजार समितीवर उपसभापती म्हणून आशाताई शिंदे (ashatai shinde) यांना यंदा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे दिसून आले. या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिका-यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी ठाकरे गटाने जल्लोषा केला.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.