अशिक्षित शेतकऱ्याने शाळेला दिली दोन एकर शेतजमीन दान

शेतकऱ्यांच्या या धाडसी निर्णयाचं सर्व स्तरावरून कौतुक
अशिक्षित शेतकऱ्याने शाळेला दिली दोन एकर शेतजमीन दान
अशिक्षित शेतकऱ्याने शाळेला दिली दोन एकर शेतजमीन दानसंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ - पुरातन काळात दानशूर बळीराजा होता, असे आपण ऐकले आहे. त्याला वामनाने तीन पाऊले जागा मागतली तर त्याने आपले सर्वस्व दिले. तो सुद्धा एक शेतकरीच होता. त्यामुळे देशात उदार, दातृत्वशिल शेतकऱ्यांची कमी नाही.त्याचा प्रत्येयत नुकताच यवतमाळ जिल्ह्यातील वाढोणा या गावात दिसून आला.

बालवयापासून शिक्षणाचे महत्व कळाले. तरी स्वतःचे शिक्षक होऊ शकले नाही. मात्र शिक्षणाप्रती असलेले प्रेम, सहानुभूती लक्षात घेऊन गावातील शाळेसाठी काहीतरी करायचे असे स्वप्न आणि स्वतः अशिक्षित असलेल्या घाटंजी तालुक्यातील वाढोणा येथील शेतकरी परशराम वाढई यांनी बाळगले आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाकरिता चक्क दोन एकर शेतजमीन गावातील जिल्हा परिषद शाळेला दान दिली.

हे देखील पहा -

घाटंजी तालुक्यातील वाढोणा येथे परशराम वाढई वास्तव्यास आहेत. बालवयात स्वतः शिक्षण घेऊ शकले नाही. मात्र, शिक्षणाप्रती प्रेम,सहानुभूती खुप होती. शेतकरी परशराम वाढई यांना शोभा प्रधान, जेबी लेनगूरे, दुर्गा चौधरी, माला चौधरी अशा चार विवाहती मुली आहेत. त्या चारही मुलीचे केवळ सातवी पर्यंत शिक्षण झाले.गावात एक ते आठ पर्यंत शाळा आहेत. मात्र शाळा अतिशय किचकट जागेत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवताना मोठी कसरत करावी लागते.

अशिक्षित शेतकऱ्याने शाळेला दिली दोन एकर शेतजमीन दान
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आरोग्य केंद्रातील 5 जणांचे निलंबन

गावातील कमी जागेत असलेली शाळा पाहूण शेतकरी परशराम वाढई यांनी शाळेसाठी शेतजमीन देण्याचा निर्णय गेल्या पाच वर्षा आधी घेतला. मात्र दान देण्याबाबतची प्रोसिजर त्यांना माहीत नसल्याने विलंब झाला.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक अशोक सिंगेवार यांना जागा दान देण्याबाबत वाढईंनी भावना बोलून दाखवली. त्यातच कोरोना संकटने हाहाकार माजविला त्यामुळे हा विषय पुन्हा थांबला त्यानंतर मुख्याध्यापक यांनी जमिन शाळेच्या नावे करण्यासाठी लागणारी रक्कम जमा केली आणि ३० सप्टेंबरला दोन एकर जमीन शाळेच्या नावे करून घेतली.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com