मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा कांदा विकृताने सडवला

मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा कांदा विकृताने सडवला
onion.jpg

पुणे - जुन्नर Junnar तालुक्यातील राजुरी Rajuri गावातील शेतकरी Farmer सुनील हाडवळे कोरोनाशी Corona झुंज देत असताना उपचारानंतर त्यांचा मृत्यु झाला कुटुंबाचा आधार हरवत असताना मागे कष्टाने पिकवलेल्या कांद्यावर Onion अज्ञांतानी युरियाचे Urea पाणी मारल्याने कांद्याची आरणच सडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये 150 कांदा पिशव्यां खराब  होऊन एक लाख 20 हजारांचे नुकसान Damage  झाले आहे. unkonwn perosn put urea on onions

सध्या कोरोना काळात अनेक मदतीचे हात पुढे येऊन मदत करत जीव वाचविण्यासाठी माणुसकीचे दर्शन देत आहे. मात्र जुन्नर तालुक्यातील राजुरीत मात्र उलट घडलय शेतकरी कोरोनाशी लढत असताना त्याच्या साठवणुकीतील कांद्याचे नुकसान करण्यासाठी कांदा चाळणीवर युरिया मिश्रित पाणी मारल्याचा प्रकार घडला आहे. या कृत्यामुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे.

हे देखील पहा -

शेतकऱ्याचा रुग्णालय कोरोनात मृत्यू झाला आणि मागे त्याच्या शेतात काढलेल्या कांद्यावर युरिया मिश्रित पाणी टाकल्याने  मोठं नुकसान झालं आहे.राजुरी येथील ही घटना आहे. शेतकऱ्याच्या कांदा आरणीवर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने १५० पिशव्यां खराब  होऊन एक लाख विस हजार रूपयांचे नुकसान  झाले आहे. unkonwn perosn put urea on onions

आज सकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे  भाऊ विलास हाडवळे हे कागद टाकण्यासाठी कांद्याच्या चाळी जवळ गेले असता कांदा पुर्णपणे सडुन त्याचा वास येत असल्याचे आढळुन आले तर त्यांना या आरणीवर काही प्रमाणात युरिया आढळून आला.त्यांनी कांद्यावरील पात बाजुला केली असता आतमध्ये संपुर्ण कांदा सडलेला त्यांना दिसुन आला. त्यामुळे शेतकऱ्याच्या मरणानंतर मागे कुटुंबाला आधार देण्याऐवजी त्याचे केलेल्या नुकसानीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com