अवकाळी पावसाचा द्राक्ष शेतीला फटका; लाखो रुपयांचे नुकसान

तर दावण्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हाता तोंडाला आलेल्या बागा वाया जाण्याची भीती वाटू लागली आहे.
अवकाळी पावसाचा द्राक्ष शेतीला फटका; लाखो रुपयांचे नुकसान
अवकाळी पावसाचा द्राक्ष शेतीला फटका; लाखो रुपयांचे नुकसानविजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. महापुरानंतर आता ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे गड कुजने, फुलोरा गळणे असा फटका पिकाला बसत आहे. तर दावण्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हाता तोंडाला आलेल्या बागा वाया जाण्याची भीती वाटू लागली आहे.

तर सांगलीच्या वाळवा तालुक्यात तब्बल तीन हजार हेक्टर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. याठिकाणचा शेतकरी हतबल झाला आहे. रोज वातावरण बदलणे औषध फवारणी रोज शेतकऱ्याला करावी लागत आहे. एकीकडे दोन वेळा महापुराचा फटका या भागाला बसला आहे. गावाला पाण्याने वेढा घातला होता त्यावेळी द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले होते. आणि आता या अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. एकीकडे कामगार पण मिळत नाहीत. औषध भरमसाठ किमतीने घेऊन फवारणी केली जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर पूर्ण बाग वाया जाणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागला आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com