Rose Flower: व्हॅलेंटाईन डे येतोय अन् मावळमधील गुलाबांचा व्यापार 'असा' सजतोय...

Rose Flower In Maval: व्हॅलेंटाईन 'डे'साठी मावळातून गुलाब निघाला परदेशात; गुलाबाची फुले पाठवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू...
Rose Flower: कामगार फुलांची पॅकिंग करताना
Rose Flower: कामगार फुलांची पॅकिंग करतानादिलीप कांबळे

मावळ: जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन 'व्हॅलेंटाईन डे'साठी (Valentine Day 2022) सज्ज होताना दिसत आहे. पण तुम्हाला माहितेय का? या तरूणाईच्या हातातल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यामधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, यूरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब (Rose) पाठवले जात आहेत. यामुळं थोडेथोडके नव्हेत तर लाखो रुपये शेतकऱ्यांच्या (Farmers) हाती पडणार आहेत. याशिवाय देशातील मुंबई, दिल्ली, बेंगळूरु, कोलकाता आदी मोठ्या शहरात फुले जातील ती गोष्ट वेगळीच. मग 'रेड रोझ' (Red Rose) हातात घेऊन शेतकऱ्यानंही 'हॅपी व्हॅलेंटाइन डे' म्हटलं तर बिघडलं कुठं..? (Valentine's Day is coming and the rose trade in maval is growing up)

हे देखील पहा -

संपूर्ण जगभरातील तरूणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन ‘डे’ (Valentine Day) अवघ्या आठवड्यावर येवून ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना (Love) व्यक्त करण्यासाठी मैत्रीचे प्रतिक असलेल्या गुलाब फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या तयारीसाठी मावळातील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असल्याने यावर्षी व्हॅलेंटाईन ‘डे’ ला मावळातून 25 ते 30  लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) निर्यात होणार असून, स्थानिक बाजारपेठेत 60 ते 70 लाख गुलाबांची मागणी आहे. असं फुल उत्पादक मुकुंद ठाकर (Mukund Thakar) यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितलं.

आपली प्रेम भावना व्यक्त करणारा व्हॅलेंटाईन ‘डे म्हणजे मैत्री दिन १४ फेब्रुवारीला आहे. या दिवशी देश-विदेशातून गुलाबाला मोठी मागणी असते. यामुळे व्हॅलेंटाईन 'डे'च्या पार्श्वभूमीवर मावळातील फुल उत्पादक शेतकरी हे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून फुलांच्या झाडांची कटींग व बेंडींगला प्रारंभ करून चांगल्या प्रतीच्या गुलाब उत्पन्न व दर्जासाठी अडीच महिन्यांपासून दिवस-रात्र शेतात राबत आहे. २० जानेवारी ते १० फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेत फुलांच्या निर्यातीचा कालावधी असतो. यावर्षी मावळातील गुलाबांच्या निर्यातीला २६ जानेवारीला सुरूवात झाली. यावर्षी पोषक वातावरण असल्याने फुलांच्या उत्पादनाबरोबरच दर्जाही उत्तम आहे. पोषक वातावरणामुळे औषधांवर होणारा नाहक खर्च कमी झाला असून, उत्पादन, दर्जा आणि मागणीमुळे फुल उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र यावर्षी विदेशी बाजारपेठेत मागणी घटल्याने शेतकऱ्यांसह फुलउत्पादक कंपन्याना काहीसा फटका बसणार आहे.

फुलांच्या दराची प्रतवारी ही लांबीनुसार ठरली जाते. स्थानिक व जागतिक बाजार पेठेत चाळीस ते साठ सेंटीमीटरच्या फुलांना मोठी पसंती असते. यावर्षी मावळातील फुलांना चांगली मागणी असून, प्रतवारीनुसार जागतिक बाजारपेठेत सध्या एका फुलाला चौदा ते पंधरा रूपये तर स्थानिक बाजारपेठेत बारा ते तेरा रूपये भाव मिळत आहे. व्हॅलेंटाईन ‘डे’ ला मावळातील ‘डच फ्लॉवर’ प्रजातीतील लाल रंगाच्या टॉपसिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्परक्लास, ग्रीनगला, फस्टरेड, पिवळ्या रंगाच्या गोल्डस्ट्राईक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल,पॉईजन, ऑरेंज नारंगी रंगाच्या ट्रॉफीकल अमेजॉन, झाकिरा, पांढऱ्या रंगाच्या अविलॉंस, या फुलांना दर्जा व टिकाऊपणामुळे जपान, हॉलंड, थायलंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, इग्लंड, जपान, दुबई व इथोपिया या देशातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळूर, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, पाटणा, कोलकता, भोपाळ, इंदोर, सुरत, हैद्राबाद व गोवा या स्थानिक बाजारपेठेत सर्वाधिक मोठी मागणी असते.

Rose Flower: कामगार फुलांची पॅकिंग करताना
Wedding Anniversary: ​​...जेव्हा रितेश देशमुख जेनेलियाच्या 8 वेळा पाया पडला होता!

प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबाला बाहेरच्या देशात मोठी मागणी असते. दरम्यान व्हॅलेंटाइन डे आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि हा मावळातील गुलाब परदेशात पाठवायायला शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाचं प्रतिक म्हणून हा गुलाब दिला जातो. कामगारही आपला गुलाब परदेशात जाणार म्हणून अतिशय प्रेमाने पॅकिंग करताना दिसत आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने मावळात करोडो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांची आपला गुलाब परदेशात पाठवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com