Wardha: अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मदत निधी प्रशासनाला प्राप्त

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मदत निधी प्रशासनाला प्राप्त
Wardha: अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मदत निधी प्रशासनाला प्राप्त

चेतन व्यास

वर्धा : वर्धा जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्‍यात पावसासह पुराने चांगलेच थैमान घातले होते. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना (Farmer) मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली होती. मात्र ही मदत शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. याबाबत साम टीव्हीने बातमी लावून धरत मुख्यमंत्री यांना आश्वासनाची आठवण करून दिली. अखेर आज वर्धेच्या (Wardha) जिल्हाधिकारी कार्यालयाला अतिवृष्टी व पूर बाधित शेतकऱ्यांची 364 कोटी 65 लाख 91 हजाराचा निधी प्राप्त झाला आहे. (Wardha News Farmer Fund)

जुलै, ऑगस्ट महिन्‍यात (Heavy Rain) अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील 2 लाख 54 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये 2 लाख 32 हजार 646 शेतकरी बाधित झाले. जिल्हा प्रशासनाने 364 कोटी 65 लाख 91 हजाराच्या मदतनिधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारने ८ सप्टेंबरला शासन निर्णय काढत मदतीचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र अद्याप निधी प्राप्त झाला नव्हता. हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

थेट खात्‍यात होणार जमा

364 कोटी 65 लाख 91 हजाराचा पूर व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचा मदतनिधीचा आज प्राप्त झाला असून हा निधी आजच तालुकानिहाय तहसीलदारांकडे वर्ग केल्या जात आहे. तालुकानिहाय तहसीलदार हे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com