Wardha: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनो बँक खाते चालू स्थितीत ठेवा; लवकरच खात्यात जमा होणार मदतीची रक्कम

जुलै आणी ऑगस्ट महिण्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
Wardha News
Wardha NewsSaam Tv

चेतन व्यास, वर्धा

वर्धा - जुलै आणी ऑगस्ट महिण्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात आता थेट मदत राशी जमा केली जाणार आहे. काही शेतकऱ्यांचे काही कारणास्तव खाते बंद स्थितीत असल्याची माहिती आहे. मदत राशी जमा करण्यासाठी शेतकऱ्यांचे खाते चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते चालू स्थितीत ठेवण्याबाबत सूचना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे दिल्या आहेत.

हे देखील पाहा -

जिल्ह्यात अतिवृष्टी आणी पुरामुळे 2 लाख 32 हजार 646 शेतकऱ्यांचे 2 लाख 54 हजार हेक्टरवर नुकसान झाले होते.जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार शासकीय मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 345 कोटी 99 लाख 59 हजारांचा निधी मागणीचा प्रस्ताव शासनाला पाठवीला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असून शासनाकडून जिल्हा प्रशासनाला मदतीचे पैसे वर्ग केले जाणार आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासन निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते करणार आहे.

Wardha News
Kalyan: मनसेच्या पदाधिकाऱ्यावर शिंदे गटातील विभागप्रमुखाच्या भावाकडून चाकू हल्ला

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत राशी थेट जमा करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांची बँक खाते चालू स्थितीत असणे आवश्यक असून त्याद्वारे त्यांना नुकसान भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आपले बँक खाते चालू ठेवण्याबाबद आपल्या स्तरावरून सर्व बँकांना सुचित करण्यात यावे असे पत्र जिल्हा कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना दिले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com