Washim News : कर्जाच्या डोंगराखाली दबला; विषारी औषध पिऊन शेतकऱ्याने केला आयुष्याचा शेवट

Washim News : डोक्यावर कर्जाचा डोंगर; विषारी द्रव घेत शेतकऱ्याने संपविले जीवन
Washim News
Washim NewsSaam tv

मनोज जयस्वाल

वाशिम : पावसाचा लहरीपणा यात होत असलेले पिकांचे नुकसान. याची चिंता लागून होती. शिवाय शेतीतून उत्पन्न मिळणार नसल्याने कर्ज (Washim) कसे फेडायचे याची चिंता लागून लागून होती. याच विवंचनेत शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मानोरा तालुक्यात घडली आहे. (Latest Marathi News)

Washim News
Beed Online Fraud News: जम्मू- काश्मीरमध्ये बसून बीडच्या सिमेंट व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा; सायबर पोलिसांकडून तिघांना अटक

वाशीमच्या मानोरा तालुक्यातील गव्हा येथील संदीप राठोड (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापीकी, वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामुळे कर्ज कसे फेडावे व संसार कसा चालवा या विवंचनेत संदीप राठोड होते. याच विवंचनेत शेतकऱ्यांने शेतात जात विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

Washim News
Nashik Accident News : दोन मोटर सायकलची धडक, दोन जण गंभीर जखमी; अपघाताची थरारक घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

इतरांसारखे उत्पादनाची अपेक्षा 

आपल्या शेतातही इतरां सारखे उत्पादन व्हावे व आपलीही आर्थिक प्रगती होऊन आपले कुटुंबही सुखी व्हावे यासाठी धडपड करत आपल्या आई व वडील यांचे नावावर असलेल्या साडेतीन एकरावर ४५ हजार रुपयाचे दी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले. तेवढे कर्ज  फेडणे  कठीण होत असल्याने  संदीप यांनी टोकाचे  पाउल  उचलले आणि आपली जीवनयात्रा संपवली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com