'वेलकम शेतकरी गो बॅक कंपनी' राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात राबविणार- बच्चू कडू

हे तंत्र शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam Tv

अकोला - वेलकम शेतकरी गो बॅक कंपनी हा राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात राबविणार असल्याची माहिती अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी दिली आहे. शेतकर्‍यांनी तयार केलेले हे बियाणे अन्य शेतकर्‍यांपर्यंत स्वस्तात पोहोचावे या उद्देशाने येत्या 6 जून रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बियाणे महोत्सव आयोजित करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे (Farmer) बियाणे शेतकर्‍यांसाठी बिज म्हणून उपलब्ध करून देऊन वेलकम शेतकरी गोबॅक कंपनीच्या धर्तीवर हा प्रयोग राज्यात प्रथम राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

हे देखील पाहा -

अकोल्यातील जिल्हा नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात सन 2022-23 च्या खरीप हंगाम नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा आदी उपस्थित होते. पालकमंत्री कडू म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मेहनतीने जिल्ह्यातील सर्वाधिक पेरणी होणारे सोयाबीन पिकाचे बियाणे घरच्या घरी तयार केले आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागाच्या अधिकारी- कर्मचार्‍यांनी मार्गदर्शन केले आहे.

Bachchu Kadu
चौदा ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पोलिसांनी चोरट्यांना केले जेरबंद

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, लोकांना रासायनिक शेतीकडून सेंद्रिय वा जैविक शेतीकडे वळण्यास उद्युक्त करण्यासाठी समर्थ पर्याय द्यावा लागेल. त्यासाठी हे तंत्र शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com