यावर्षी सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासणार?

यावर्षी सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासणार?
soyabean

अकोला - यावर्षी सोयाबीनला Soyabean  मिळालेला चांगला दर आणि बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस Cotton उत्पाद घटत असल्याने यावर्षी सोयाबीन पेरणी क्षेत्र वाढीची शक्यता आहे. मात्र यावर्षी सोयाबीन बियाण्यांची Soyabean Seads कमतरता भासणार आहे. कारण गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे Heavy rain सोयाबीन उत्पन्नात झालेली घट यामुळे सोयाबीन बियांण्यासाठी शेतकऱ्यांना Farmer मोठी कसरत करावी लागणार आहे. Will there be a shortage of soybean seeds this year

उन्हाळा Summer आता शेवटच्या टप्प्यात असल्याने शेतकरी खरिपाच्या शेवटच्या तयारीला लागले आहेत. शेतीच्या मशागती सोबत यावर्षी शेतात पेरावयाच्या बियाण्यांचा कानोसा घ्यायला आता शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. मात्र या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासू शकते.  

हे देखील पहा -

राज्यात खरीप हंगामाचे एकूण एक कोटी 41 लाख 94 हजार हेक्टर क्षेत्र असून ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मुग, उडीद, भूईमूग, सोयाबीन, कापूस हे प्रमुख पीके उपलब्ध आहेत. राज्यात बियाणे बदल दरानुसार 16 लाख 67 हजार क्विंटल बियाण्यांची गरज असून महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि खासगी कंपन्या यांच्या माध्यमातून बियाण्यांचा पुरवठा केला जातो. राज्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र 42 लाख 22 हजार 165 हेक्टर आहे. त्यासाठी 31 लाख 66 हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता आहे. तर यावर्षी सोयाबीनला सात हजाराच्या वर दर मिळाल्याने सोयाबीन शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पेरा कडे जास्त राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलाय.   Will there be a shortage of soybean seeds this year

सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासू नये यासाठी राज्यशासनामार्फत शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणे वापरण्याबाबत आवाहन केले होते. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांकडे स्वत:चे सुमारे 20 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे दावा कृषी विभागाने केला आहे. मात्र वास्तवात इतक्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे बियाणेच उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन बियांण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे सरकारने सोयाबीन बियाण्यांचे नियोजन करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

गेल्या वर्षी राज्यात सोयाबीनचे क्षेत्र ४१ लाख हेक्टर होते. त्यातल्या अर्ध्या क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसला होता. बियाण्यासाठी खास राखीव ठेवलेल्या प्रक्षेत्रांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. त्यामुळे या वर्षीच्या हंगामात बियाण्याची कमतरता भासणार आहे. सोयाबीनचे चांगल्या वाणाचे बी एकदा पेरले की सलग 2 वर्षे त्याच प्रतीचे पीक येते. एका हेक्टरला साधारण 1 क्विंटल बियाणे लागते. राज्याच्या संपूर्ण क्षेत्राचा विचार करता 173 लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. इतके बियाणे थेट बाजारपेठेतून ऐनवेळी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आहे ते बियाणे चढ्या भावाने खरेदी करावे लागेल. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.  Will there be a shortage of soybean seeds this year

महाबीजचे केवळ अर्ध्यावर नियोजन-

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थातच महाबीज दरवर्षी सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत असते. मात्र यावर्षी सोयाबीन बियाण्यांचे नियोजन निम्म्यावर आले आहे. दरवर्षी महाबीज चार लाख ते साडे चार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करून देते. तर यावर्षी केवळ दोन लाख पाच हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन महाबीजने केले आहे. त्यामुळे आता खाजगी कंपन्या किती बियाणे उपलब्ध करून देतात ते पाहावे लागेल.

महाबीजचे दर जैशे थेच-

कृषिमंत्री दादा भुसे यांनी महाबीजला सोयाबीन बियाण्यांचे दर न वाढवण्याबाबत निर्देश दिले होते त्यानुसार यावर्षी महाबीज आपल्या सोयाबीन बी दरात कुठलीही वाढ केली नसल्याची माहिती आहे. मात्र दरवर्षी बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. तर खाजगी कंपन्यांचे बियाण्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. Will there be a shortage of soybean seeds this year

गेल्या वर्षी सदोष बियाण्यांचा फटका-

महाराष्ट्र बियाणे महामंडळ अर्थात 'महाबीज'. संपूर्ण खरीप हंगामात महाबीजचं सोयाबीन बियाणं वादग्रस्त ठरलं आहे. राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांवर यामूळे दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. यासंदर्भात महाबीजसह सोयाबीन इतर खाजगी बियाणे कंपन्यांच्या विरोधात राज्यभरात मोठा रोष निर्माण झाला होता.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com