
- संजय राठोड
यवतमाळ : राज्यातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकदुसऱ्यांविरोधात टीकेचे भोंगे वाजवित आहेत. या राजकीय भोंग्यांच्या आवाजात शेतकऱ्यांच्या (Farmers) मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे राजकीय भोंगे बंद करुन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यात यावे अन्यथा मंत्रालयासमोर व नेत्यांच्या घरासमोर शेतकरी आक्रोश भोंगे वाजवतील असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला होता. आता मुंबई येथे मंत्रालयासमोर भोंगे वाजविण्यासाठी यवतमाळचे (Yavatmal) शेतकरी आज मुंबईला रवाना झाले आहे.
हे देखील पाहा :
शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निवेदन पाठवून शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्याची मागणी केली होती. यामध्ये दि. 1 मे पासूनशेतकऱ्यांना दररोज दिवसा 10 तास वीज देण्यात यावी. साखर उत्पादक कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचे बील एफआरपी प्रमाणे एक हप्त्यात द्यावे. फक्त शेतीवर अवलंबून असणान्या 65 वर्ष वयावरील शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रू पेन्शन द्यावे. सत्तेच्या सर्व सोयी मोफत उपभोगून व भ्रष्टाचार करून करोडो रूपये कमावणाऱ्या मंत्री, आमदार, खासदार व वरीष्ठ IAS व IPS अधिकारी यांचे पेन्शन बंद करावे. गाईच्या दुधाला प्रतिलिटर 40 रू भाव द्यावा. महाराष्ट्रातील दुध, भाजीपाला व इतर सर्व शेतकरी उत्पादने एमएसपी च्या यादीत राज्यापुरता एमएसपी चा कायदा लागू करावा. तेलंगणा राज्य सरकार प्रमाणे प्रत्येक शेतक-यास बियाणे व खतासाठी एकरी 10 हजार रु अनुदान द्यावे अशीही मागणी करण्यात आली असून देशभरातील इतर राज्यांना हे सर्व शक्य आहे. पण महाराष्ट्राला का नाही असा प्रश्न विनायकराव पाटील यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे राजकीय नेत्यांचे भोंगे बंद झाले नाही तर मुंबई येथे मंत्रालया समोर व वाचाळ नेत्यांच्या घरासमोर शेतकरी आक्रोश भोंगे वाजवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. आता या आंदोलनासाठी यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी वारकरी संघटनेचे नेते सिकंदर शहा, बाळू चव्हाण, बाळू राठोड, बाळू विरुटकार, आकाश टेकाडे, स्वप्नील नवले, सुमीत गावंडे, परसराम फुफरे, नारायण राठोड, विलास सोमटकार, मोहन पवार, मंगल गोवर्धन तसेच इतर चाळीस ते पन्नास शेतकरी आज मुंबईकरीता रवाना झाले. उद्या दिनांक 4 मे रोजी मंत्रालयाजवळील गांधी पुतळयासमोर राजकीय भोंगे बंद करण्यासाठी महाआरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठया प्रमाणात शेतकरी मुंबईकरीता रवाना झाले आहे. अनेक भजनी मंडळे सुध्दा मुंबईला (Mumbai) पोहोचत आहे. एकीकडे राजकीय भोंग्यामुळे राज्यातील वातावरण तापले असताना शेतक-यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी मात्र संतप्त झाला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.