शेतकऱ्यांची फसवणूक; बाजार समितीत बेमुदत उपोषण

शेतकऱ्यांची फसवणूक; बाजार समितीत बेमुदत उपोषण
Farmer
FarmerSaam tv

संजय राठोड

यवतमाळ : वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका व्यापाऱ्याने ६७ शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. मालाचे पैसे न मिळाल्‍याने शेतकऱ्यांनी (Farmer) बाजार समितीच्‍या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. (yavatmal news Fraud of farmers Indefinite fast in the market committee)

Farmer
शेती नांगरणीसाठी तिच्‍या हाती बैलजोडीची दोरी

कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत (Yavatmal News) व्यापाऱ्याने ६७ शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर खरेदी केली. मात्र खरेदी केलेल्या धान्याचे पैसे दिले नाही. आपली आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याची बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आमचे पैसे देण्यात यावे; अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली. मात्र विक्री केलेल्या धान्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उपोषण मंडपाला मनसेचे राजु उंबरकर यांनी भेट दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com