यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी संजय राठोड

यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांना बसला फटका

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने तब्बल १६ हजार शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. जवळपास ४ हजार हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. नदी आणि नाल्यांना पूर आल्याने शेतात पाणी शिरले आहे. त्यांचा फटका शेत पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

हे देखील पहा-

अतिपाण्यामुळे शेतातील पिके वाहुन गेली आहेत. काही ठिकाणी पाण्यामुळे शेतमाल पिवळी पडल्याने पिकांची वाढ थांबली आहे. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पिकविमा कंपणीकडे नुकसानाची माहिती पाठविली आहेत. जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना गारद केले आहे. त्यातून शेतकरी सावरत असताना सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टीने हाहाकार माजविला आहे.

यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
दौंड: मेडीकलमध्ये चोरी, १ लाख ४५ हजार रूपयांची रोकड लंपास

आर्णी, दारव्हा, महागांव, दिग्रस, पुसद, उमरखेड आणि यवतमाळ आदी तालुक्यातील ८३ पेक्षा जास्त गावात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. नुकसानीचा प्राथमिक अवाहलात अतिवृष्टीने १६ हजार ४७६ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एकुण ४ हजार ९१३ हेक्टरवर असलेले पिके बाधित झाली आहेत. कापूस पिकांचे ३ हजार ४६४ हेक्टर क्षेत्र बाधित असून १ हजार ३५६ हेक्टरवरील सोयाबीन पिकांचा समावेश आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com