पंजाबमध्ये हवाई दलाचे मिग-२९ विमान कोसळले

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 8 मे 2020

आज सकाळी पंजाबच्या होशियारपूरजवळ भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत या मिग-२९ विमानाच पायलट मात्र सुरक्षित आहे. ही घटना पंजाब राज्यातील नवाशहर येथे सकाळी सुमारे ११ च्या सुमारास घडली.

 

पंजाब: हवेत उडणाऱ्या एका विमानाला अचानक आग लागल्याचे काही स्थानिक लोकांनी   पाहिले. त्यानंतर थोड्याच वेळात ते विमान एका शेतात जाऊन कोसळले. मात्र, हे विमान खाली कोसळण्यापूर्वी या विमानाच्या पायलटने वेळीच विमानाबाहेर उडी घेतली, असेही स्थानिकांनी सांगितले. याचाच अर्थ पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवून विमानाबाहेर उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले.

 पंजाबमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग-२९ हे लढाऊ विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत या लढाऊ विमानाच पायलट मात्र सुरक्षित आहे. या दुर्घटनेबाबत हवाई दलाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ही घटना पंजाब राज्यातील नवाशहर येथे सकाळी सुमारे ११ च्या सुमारास घडली. या लढाऊ विमानाचा पालयट बचावला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह हवाई दलाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.
 

WebTittle :: Air Force MiG-29 crashes in Punjab


संबंधित बातम्या

Saam TV Live