विशाखापट्टणममध्ये वायू गळती 

विशाखापट्टणममध्ये वायू गळती 

विशाखापट्टणम: पॉलिमर कंपनीत झालेल्या विषारी गॅस गळतीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याबाबत कळू शकलेले नाही. वायूगळतीची माहिती मिळताच विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन तासांमध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळवले गेले असे चंद यांनी सांगितले. वायू गळतीच्या परिसरात लोकांना न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. एकूण १७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २० जण गंभीर आहेत. या विषारी वायूमुळे तीन किमीच्या परिसरावर प्रभाव पडला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी घडली.

२० लोक गंभीर असून यात बहुतेक जेष्ठ नागरिक आहेत. काही लोकांना गोपालपुरमच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक लोकांच्या उपचारासाठी रुग्णालयात १५०० ते २००० बेडची व्यवस्था करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.आर. आर. वेंकटपुरम येथे असलेल्या विशाखा एल. जी. पॉलिमर कंपनीत विषारी वायूची गळती झाली आहे. या विषारी वायूमुळे शेकडो लोकांना डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.


एल. जी. पॉलीमर्स इंडस्ट्रीची स्थापना सन १९६१ मध्ये हिंदुस्तान पॉलीमर्स या नावाने झाली. ही कंपनी पॉलिस्टायरेन आणि त्याचे को-पॉलिमर्सची निर्मिती करते. सन १९७८ मध्ये यूबी ग्रुपच्या मॅकडॉव्हल अॅण्ड कंपनी लिमिटेडमध्ये हिंदुस्तान पोलिमर्सचे विलिनीकरण झाले. त्यानंतर ही कंपनी एल.जी. पॉलिमर्स इंडस्ट्री या नावाने ओळखू लागली.

WebTittle ::  Air leak in Visakhapatnam

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com