दिल्लीची हवा गुणवत्ता पातळी यंदा चांगली

दिल्लीची हवा गुणवत्ता पातळी यंदा चांगली

नवी दिल्ली : दिवाळीनंतरची दिल्ली येथील हवा गुणवत्ता पातळी ही २०१८मधील दिवाळीनंतरच्या हवा गुणवत्ता पातळीपेक्षा अधिक चांगली आहे. दिल्लीतील पर्यावरण मंत्री कैलाश गहलोत यांनी सोमवारी ही माहिती दिली.

रविवारी दिवाळी साजरी करताना फटाक्यांचा वापर कमी केल्याबद्दल त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानले आहेत. दिवाळीनंतर सोमवारी सकाळी  देशाच्या राजधानीची हवा गुणवत्ता सर्वात खराब झाली. मात्र, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत ही परिस्थिती चांगली होती, असे सरकारी यंत्रणांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी दिवाळीनंतर दिल्लीच्या हवा गुणवत्ता यंत्रणेने ६०० गुणांची मर्यादा ओलांडली होती. जी सुरक्षा पातळीपेक्षा १२ पट अधिक आहे. २०१६ मध्ये हवा गुणवत्ता पातळी ही ४२५ तर २०१७ मध्ये ती ३६७ इतकी होती. गेल्यावर्षीच्या दिवाळीत वापरण्यात आलेल्या फटाक्यांपेक्षा यावर्षी वापरण्यात आलेले फटाके कमी होते, यात कोणतेही दुमत नाही. फटाके फोडण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी योग्यप्रकारे केली आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना अंमलबजावणी ही वेगळी गोष्ट आणि वर्तनात्मक बदल ही दुसरी गोष्ट आहे, असे कैलाश गहलोत म्हणाले.
   दिल्ली येथे एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी लोकांनी फटाक्यांचा वापर कमी केला आहे. त्यामुळेच यावर्षी दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली आहे. पर्यावरणमंत्री म्हणून मी हे म्हणत नाही तर हवेची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी ज्या ज्या लोकांना मी भेटत आहे, त्या सर्वानी हा प्रतिसाद दिला आहे. पुढील वर्षी लोक दिवाळी सण साजरा करताना पर्यावरणाविषयी ते अधिक संवेदनशीलता दर्शवतील. मंत्रालयाची चमू नियमित तपासणी करीत असून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. हवा गुणवत्ता पातळी सामान्य ठेवण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. दिल्ली सरकार लवकरच आकडेवारी जाहीर करेल, असे कैलाश गहलोत यानी सांगितले.

Web Title: Air Quality In Delhi Much Better Post Diwali Compared To 2018 Says Kailash Gahlot 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com