विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता  

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 13 मे 2020

रेल्वे सेवेपाठोपाठ देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्राकडून हिरवा कंदील मिळताच १७ मेनंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज रहा, अशी सूचना डीजीसीएने प्रमुख विमानतळ तसेच विमानसेवा कंपन्यांना दिल्या आहेत.

 

विमानसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षित वावरसाठी काय करावे, याबाबतची सूचना नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) व ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून (बीसीएएस) याआधीच देण्यात आली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने तयारी सुरू केली होतीच. डीजीसीए व बीसीएएसच्या चमूने मंगळवारी विमानतळाला भेट देऊन या तयारीचा आढावा घेतला.

रेल्वे सेवेपाठोपाठ देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्राकडून हिरवा कंदील मिळताच १७ मेनंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज रहा, अशी सूचना डीजीसीएने प्रमुख विमानतळ तसेच विमानसेवा कंपन्यांना दिल्या आहेत. याअंतर्गत कमी अंतराच्या विमानसेवा चालवल्या जाणार आहेत.

विमान सेवा सुरू झाल्य़ावर काय असतील नियम 

- लक्षणे दिसताच विमानतळात प्रवेश नाही

- मास्क घालणे व सॅनिटायझर बाळगणे अत्यावश्यक

- विमानतळावर सुरक्षित वावर अनिवार्य

- विमानतळावर जागोजागी सॅनिटायझरची सोय अनिवार्य

- विमान प्रवास शक्यतो दोन तासांपेक्षा कमी अंतराचाच असावा

- विमानात अल्पोपाहार दिला जाणार नाही

- वयवर्षे ८०वरील प्रवाशांना बंदी

- केबिन सामानाला (सोबत बाळगण्याची पर्स अथवा बॅग) बंदी

पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरु अशा महत्त्वाच्या विमानतळांवरून ही सेवा सुरू होईल. महानगरे व अ श्रेणीतील शहरांसाठी विमानसेवा सुरू होईल. तर द्वितीय श्रेणी शहरे दोन तासांच्या उड्डाण अंतरावर असले, तरच त्यासाठी विमानसेवा असेल. या दोन तासांदरम्यान प्रवाशांना अल्पोपाहार दिला जाणार नाही. विमानातील कर्मचाऱ्यांचा प्रवाशांजवळ कमीत कमी वावर असावा, याची अत्याधिक काळजी घेण्याची सूचना डीजीसीए व बीसीएएसने विमानसेवा कंपन्या तसेच मुंबईसह प्रमुख विमानतळांना दिली आहे.विमानतळावरील सूत्रांनुसार, डीजीसीए व बीसीएएसच्या चमूने विमानतळाला भेट दिल्यानंतर संबंधितांशी चर्चा केली. त्यामध्ये काही सूचना देण्यात आल्या. 

WebTittle :: The airline is expected to start soon


  


संबंधित बातम्या

Saam TV Live