विमान कंपन्यांचा कर्मचारी कपातीचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 एप्रिल 2020

कोरोनामुळं जगातल्या सर्वात बलाढ्य विमान कंपनीनं कर्मचारी कपातीचा इशारा दिला आहे. एअरबस या विमान निर्मिती करण्याऱ्या कंपनीनं कर्मचाऱी कपातीचं एक पत्र तब्बल १ लाख 35 हजार कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलंय.

कोरोनामुळं जगातल्या सर्वात बलाढ्य विमान कंपनीनं कर्मचारी कपातीचा इशारा दिला आहे. एअरबस या विमान निर्मिती करण्याऱ्या कंपनीनं कर्मचाऱी कपातीचं एक पत्र तब्बल १ लाख 35 हजार कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलंय..ज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीत कंपनीला मोठा तोटा होतोय..त्यामुळं भविष्यात कर्मचाऱी कपात करावी लागू शकते असं सांगण्यात आलंय.
मात्र, हे पत्र कंपनीचा अंतर्गत व्यवहार असून त्यावर प्रतिक्रीया देण्यास एअरबसकडून नकार देण्यात आलाय. कर्मचारी कपातीआधी फ्रान्समधल्या 3 हजार कर्मचाऱ्यांना कंपनीनं सुट्टी दिलीय. त्यातच कोरोनाचं संकट बळावलं तर कर्मचारी कपात होऊ शकते असं कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

एअरबसनं शुक्रवारी रात्री कर्मचाऱ्यांना पत्र पाठवलं. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ताळेबंद जाहीर करण्यापूर्वी एअरबसनं कर्मचाऱ्यांना पत्र पाठवून सद्यस्थितीची कल्पना दिली. कोरोनामुळे जवळपास संपूर्ण जगात लॉकडाऊन सुरू आहे. त्याचा मोठा फटका हवाई वाहतूक क्षेत्रातल्या कंपन्यांना बसला आहे. याचे थेट परिणाम आता विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नावर दिसू लागले आहेत. एअरबसनं सरकारी नियमांनुसार फ्रान्समधल्या ३ हजार कर्मचाऱ्यांना फर्लो योजनेनुसार सुट्टी दिली आहे. मात्र आता आणखी कठोर पावलं उचलावी लागतील, असं फरी यांनी पत्रात म्हटलं आहे. आता काही महत्त्वाचे निर्णय न घेतल्यास एअरबसचं अस्तित्वच धोक्यात येईल, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याआधी २००७ मध्ये एअरबस संकटात सापडली होती. तेव्हा १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला होता. आता कंपनीनं सर्व पर्याय खुले ठेवले असल्यानं कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live