'सिंघम' सह अन्य बाॅलीवूड कलाकारांचा कोरोना लढ्यासाठी मुंबई महापालिकेला मदतीचा हात

Ajay Devgan
Ajay Devgan

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण Ajay Devgan यांच्‍या एनवाय फाऊंडेशनने सामाजिक उत्‍तरदाय‍ित्‍व म्‍हणून १ कोटी रुपयांची देणगी महानगरपालिकेला BMC दिली आहे.यामध्‍ये अजय देवगण यांच्‍यासह  बोनी कपूर Boney Kapoor, समीर नायर, रजनिश खानुजा, दीपक धर, तरुण राठी, अशीम प्रकाश बजाज, लीना यादव, आर. पी. यादव, लव रंजन, आनंद पंड‍ित या सर्वांनी देखील वाटा उचलला आहे.

कोविड-१९ Corona विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी दादर (पश्चिम) Dadar West येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये मुंबई महानगरपालिकेने २० रुग्‍णशय्या क्षमतेचे 'कोविड एचडीयू' रुग्‍णालय उभारले आहे. त्यामुळे आता हिंदुजा रुग्णालयातच Hinduja Hospital दाखल होण्याची इच्छा प्रकट करणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या या रुग्णालयात अॅडमिट होवून हिंदुजाच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेता येणार आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat मोफत लसीकरणासाठी आपले एक वर्षाचे मानधन देणार आहेत. तसेच काँग्रेस मंत्री व आमदारही एका महिन्याचे मानधन देणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीही Maharashtra Pradesh Congress Committee मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाखांची मदत देणार आहे.

दरम्यान, कोविड सेंटरमध्ये नागरिक नोंदणी न करता गर्दी करत आहेत. माझी विनंती आहे त्यांना की कृपया नोंदणी करूनच घ्या... आज अनेकांना नोंदणी न करता प्रवेश दिला आहे. माञ उद्यापासून नोंदणी नसलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही. जेवढ्या मोठ्या प्रमाणात लस मिळतील तेवढ्यांना लस मोफत दिली जाईल. तरुणांना १५ मे नंतर लस दिली जाणार आहे. लवकरच इतर केंद्र सुरू होतील, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी येथे सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com