शिवेंद्रराजेंच्या मागणीला अजितदादांचा प्रतिसाद

ओंकार कदम
गुरुवार, 27 मे 2021

शिवेंद्रराजेंच्या मागणीला साद घालत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी साताऱ्यात येणार आहेत.

सातारा : शिवेंद्रराजेंच्या Shivendraraje मागणीला साद घालत उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope कोरोनाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी साताऱ्यात येणार आहेत. Ajit Pawar and Rajest Tope to visit Satara on Friday as demanded by Shivendraraje

कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत सातारा Satara जिल्ह्यात रोज साधारण 1800 ते 2500 च्या दरम्यान रुग्ण आढळू लागले आहेत.काही केल्या रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने या गंभीर परिस्थितीची पाहणी करून या वर ठोस पावले उचलण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साताऱ्यात यावे अशी मागणी साताऱ्याचे भाजप चे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली होती.

हे देखिल पहा

अवघ्या तीन च दिवसात त्यांची मागणी मान्य करत शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील करोना परिस्थिती चा आढावा घेण्यासाठी हे दोन्ही मंत्री साताऱ्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. Ajit Pawar and Rajest Tope to visit Satara on Friday as demanded by Shivendraraje

राष्ट्रवादीच्या मंगलदास बांदल यांना अटक

तसेच जिल्ह्यातील बेड ची संख्या पहिल्या पासून कमी पडत असल्याने रुग्णांना बेड मिळण्यासाठी कोविड सेंटर च्या बाहेर उभे राहावे लागत आहे. ऑक्सिजन, इंजेक्शन आशा अनेक पातळीवर प्रशासनाला अपयश आल्याने जिल्ह्यातील करोना बधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अखेर भाजप आमदार शिवेंद्रराजेंनी या भेटीची मागणी केली होती.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live