वाझे प्रकरणात माझी चौकशी करावी; अजित पवारांचे विरोधकांना खुले आव्हान

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझे प्रकरणी झालेला आऱोप फेटाळून लावला आहे. या प्रकरणी माझी  चौकशी करावी असे खुले आव्हान ही अजित पवार यांनी आज विरोधकांना दिले आहे.

पंढरपूर : वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh)आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे.  दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझे प्रकरणी झालेला आऱोप फेटाळून लावला आहे. या प्रकरणी माझी  चौकशी करावी असे खुले आव्हान ही अजित पवार यांनी आज विरोधकांना दिले आहे. Ajit Pawar Challenges Opposition about Waze allegations Probe

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज पंढरपुरात आले आहेत. आज सकाळी त्यांच्या उपस्थितीत भाजप (BJP) नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी आढीव येथील काळें यांच्या फार्महाऊसवर पत्रकारांशी संवाद साधला असता. त्यावेळी त्यांनी वाझे प्रकरणी खुलासा  केला आहे.

यावेळी पवार म्हणाले, वाझे या व्यक्तीला  मी कधीही भेटलो नाही. माझं वाझेशी कधी संभाषण देखील झालं नाही. त्याने माझ्या नावाच उल्लेख करण्याचं काहीच कारण नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे .यावर माझे याप्रकरणात नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा आहे. सध्या अनिल देशमुखांची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिलेच आहेत. त्यात माझीही चौकशी करावी, या चौकशीत दूध का दूध पानी का पानी होईल. विरोधकांकडून  जाणूनबुजून महाविकास आघाडीचे  सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केले. 

Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live