मताधिक्यात अजित पवार 'नंबर वन'!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

पुणे: बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी 1 लाख 94 हजार 317 मते मिळवली. अजित पवार यांना तब्बल 1 लाख 64 हजार 35 मतांची आघाडी मिळाली. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाले आहे

नांदेड जिल्ह्यात भोकर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 1 लाख 39 हजार 737 मते मिळवली. त्यांना 96 हजार 856 मतांची आघाडी मिळाली आहे.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाचे धीरज देशमुख यांना 1 लाख 34 हजार 615 मते मिळाली दुसऱ्या क्रमांकावर नोटा या पर्यायाला 27449 मते मिळाली. शिवसेनेच्या उमेदवाराने येथे प्रचार केला नाही. त्यामुळे या निवडणुकीची सर्व रंगत निघून गेली होती.

सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाचे विश्‍वजित कदम यांना 1 लाख 70 हजार 34 मते मिळालेली आहेत. तेथेही दुसऱ्या क्रमांकावर नोटा या पर्यायाला  20 हजार 572 मते मिळालेली आहेत. विश्वजीत कदम यांना या मतदारसंघांमध्ये 1 लाख 49 हजार 462 मतांची मोठी आघाडी मिळालेली आहे.

Webtittle: Ajit Pawar is 'Number One' in the vote!

संबंधित बातम्या

Saam TV Live