अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाचे टोचले कान

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे

सातारा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत Corona Second Wave सातारा जिल्ह्याचा रेड झोनमध्ये Red Zone समावेश झाला आहे. राज्याच्या रूग्ण वाढीच्या संख्येच्या तुलनेत सातारा Satara जिल्ह्याची टक्केवारी 1.47 असून सक्रिय रूग्ण Active patient संख्येत सातारा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे Corana  21819 रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग Corona infection कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे  प्रयत्न अपुरे पडत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy CM Ajit Pawar आणि आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे Health Minister Dr. Rajesh Tope यांना अखेर साताऱ्यात येऊन प्रशासनाचे कान उपटावे लागले. (Ajit Pawar pierced the ears of the district administration)

जिल्ह्यातील सध्याच्या या गंभीर परिस्थितीचा बारकाईने विचार केला तर केवळ जिल्ह्यातील जनतेला दोष देऊन चालणार नाही.  जिल्हा प्रशासनाने त्यांच्या भूमिका योग्य पद्धतीने पार पाडलेल्या नसल्याचे जाणवत आहे . जेव्हा पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झाला तेव्हा, प्रशासनाने ती बाब गंभीरपणे घेतली होती. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल किंवा हॉटस्पॉट असतील या गोष्टींकडे पहिल्या लाटेत प्रशासनाने गंभीरपणे बघितले होते. त्यामुळे पहिली लाट प्रशासनाला थोपवण्यात बऱ्यापैकी यश आले होते. परंतु दुसऱ्या लाटेची कल्पना असून सुद्धा रुग्ण संख्या वाढणे सुरू होत नाही तोपर्यंत प्रशासनाने कोणतीच पावले उचलली नाहीत. जेव्हा कोरोना  रुग्ण संख्या वाढू लागली तेव्हा लॉकडाउनच पाहिलं पाऊल उचलून प्रशासन गप्प बसले. 

परंतु कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, होम आयसोलेशनच्या नियमांची कडक अंमलबजावणी, आयसोलेशन सेंटर वाढवणे बंद पडलेली सुरू करणे या कोणत्याच बाबींचा प्रशासनाने विचार केला नाही.  त्यामुळे हळूहळू रोज 2000 पेक्षा जास्त रुग्ण साताऱ्यात आढळू लागले आहे. साताऱ्यात कराड आणि काही प्रमाणात सातारा हे दोन तालुके सोडले तर इतर तालुक्यात आरोग्य सेवाच व्हेंटिलेटरवर आहेत. 
या बाबीचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे होते. 

 केवळ साताऱ्यात एक जम्बो कोविड सेंटर उभारून प्रशासनाने हातवर केले.  परंतु फलटण, माण-खटाव या भागांमध्ये दुर्लक्ष झाल्याने या भागातून रुग्ण वाढ होऊ लागली. शेवटी उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना जिल्ह्यात येऊन सर्व प्रशासनाची कान उघडणी करावी लागली. या वेळी सभागृहात झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी कोरोना महामारीत खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारणी केली जात आहे. त्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यामुळे यापुढे प्रत्येक खाजगी रुग्णालयात दररोज नेमून दिलले ऑडिटर जातील. तसेच रोजच्या रोज बिलांची तपासणी करतील अशी माहिती मिळाली आहे. 

दरम्यान, कोणत्याही हॉस्पिटलकडून जर बिलाच्या बाबतीमध्ये गफलत केली आणि रुग्णाला त्रास दिला तर गाठ अजित पवारांची आहे, अशी सज्जड दमबाजी त्यांनी खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाना केली आहे .सातारा येथील जिल्हा जम्बो कोविड केंद्राच्या तक्रारीवर अजित पवार यांनी भाष्य केले. जम्बोवर लक्ष ठेवा. मृत्यूदर कमी करा, असे आदेश त्यांनी दिले आहे . सातारा जिल्ह्यातील खाजगी, सरकारी रुग्णालय आणि फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडिटझ स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तत्काळ पूर्ण करून घ्यावे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या अनुषंगाने जी उपकरणे खरेदी करायचे आहेत 

तसेच जी उपकरणे जॉब करण्याची तपासणी करायची आहे, ती तत्काळ करून घ्यावी ज्या खासगी लॅब नियमानुसार काम करत नाहीत त्यांची नोंदणी रद्द करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. साखर कारखान्याची मदत घेऊन ऑक्सीजन यंत्रणा उपलब्ध करावे, असे सांगितले आहे . एकूणच काय तर प्रशासनाने योग्य वेळेत जर योग्य पावले उचलली असती तर सातारा जिल्ह्याला रेड झोनमध्ये  जाण्यापासून वाचवता आलं असत. आता अजित पवारांनी दिलेल्या इंजेक्शन नंतर प्रशासन मरगळ झटकून कामाला लागणार का हे पाहावे लागणार आहे. 

Edited By - Puja Bonkile 

हे देखिल पहा - 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com