ajit pawar.jpg
ajit pawar.jpg

अनलॉकच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात गोंधळ; अजित पवारांनी दिले उत्तर 

वृत्तसंस्था : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी गुरुवारी  राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवल्याची घोषणा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड गोंधळ उडल्याचे पाहायला मिळाले आहे.  तर विरोधकांनीही यावर जोरदार टीका केली आहे.  अनलॉकसंबंधी Unlock  घोषणा केल्यानंतर सारे निर्बंध शिथिल झाल्यासारखं चित्र निर्माण झालं होतं.  त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy CM Ajit Pawar यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.  रायगडमध्ये  आयोजित एक पत्रकार परिषदेत बोलत होते. (Ajit Pawar replied after the issue of unlock caused confusion in political circles) 

“ज्या दिवशी राज्यात कोरोनाने शिरकाव केला तेव्हापासून  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे सोशल मीडिया आणि मध्यमांसमोर सरकारची भूमिका  स्पष्ट करत आहेत. पण कालच्या पत्रकार परिषदेत बोलताना घाई गडबडीत विजय वडेट्टीवार यांच्याकडून  तत्त्वत: हा शब्द राहून गेला ज्यामुळे  प्रचंड गोंधळ उडाला. मात्र अद्यापही सरकारमध्ये अनलॉकबाबत पूर्णपणे सुसंवाद आहे. त्यामुळे सरकार कोणाचंची असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री सांगतील तो अंतिम निर्णय असतो. 


तर,  विजय वडेट्टीवारांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले. आपत्ती व्यवस्थापन बैठकीत राज्यातील काही जिल्ह्यांमधील लॉकडाऊन रद्द करण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. पण  मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत बोलताना तत्त्वत: हा शब्द विसरून गेलो,  असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटल होतं.  तसेच, याबाबत अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असून त्यांची संमती  परवानगी मिळाल्यानंतर  या जिल्ह्यातील अनलॉकबाबतची अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते निर्णय लागू होतील, असेही यावेळी विजय वडेट्टिवार यांनी म्हटल आहे.  तर, विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली, त्यांना ती मांडावीच लागते. पण यात श्रेयवादाचा विषय नसून सरकार म्हणून जे काही करायला हवं ते आम्ही करत आहोत,'' असे म्हणत त्यांनी फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तरही दिले. 

Edited By - Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com