VIDEO | सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांवर अद्यापही टांगती तलवार

VIDEO | सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांवर अद्यापही टांगती तलवार


सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना अजूनही दिलासा मिळालेला नाहीये. सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी या जनमंचच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. १३ फेब्रुवारीला आता सिंचन घोटाळ्याप्रकरणी अंतिम सुनावणी होणार आहे.

सिंचन घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोध केलाय. माझ्याविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचं शपथपत्र अजित पवार यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केलंय.

'मंत्री म्हणून कर्तव्य बजावताना मी कोणत्याही भ्रष्ट अथवा बेकायदा कृत्यात सहभागी झालेलो नाही. मंत्री आणि व्हीआयडीसीचा माजी अध्यक्ष या नात्याने मी सर्व नियमांचे पालन करूनच सार्वजनिक कर्तव्ये पार पाडली आहेत. तसेच सिंचन घोटाळ्याच्या कोणत्याही एफआयआर अथवा आरोपपत्रांमध्ये मला आरोपी केलेले नाही. त्यामुळे या घोटाळ्यात मी आरोपी नाही, मला आरोपी ठरविता येणार नाही, असेच माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाला देता येणार नाही', 

विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळा केल्याचे आरोप अजित पवारांवर झालेत, अजित पवारांना राजकीयदृष्ट्या मोठी किंमत मोजावी लागली होती. विरोधकांकडून तर सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन अजितदादांना नेहमीच टार्गेट केलं जातं. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी न्यायालयात शपथपत्र सादर केलं असलं तरी अजूनही अजित पवारांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे.

WebTittle:: Ajit Pawar still hangs sword for irrigation scam


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com