कडक निर्बंधांचा अजितदादांचा बारामतीकरांना इशारा    

Ajit Pawar
Ajit Pawar

बारामती : बारामती  तालुक्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत आहे, पूढील दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठकीत दिला आहे.  Ajit Pawar warns of strict restrictions if Baramatikars do not control Corona

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "सध्याची स्थिती पाहता बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास  कडक निर्बंध लागू करण्याचा, विचार करावा लागेल. ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण  जास्त आहेत, त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करा. ते करतांना नगरसेवकांना विश्वासात घ्यावे.'''

''ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यावर भर द्यावे लागणार आहे. पुणे जिल्हा परिषदेने ज्याप्रकारे कोरोना अपडेटसाठी तयार केले आहे त्याच धर्तीवर बारामती तालुक्यासाठीही ॲप तयार करा. जेणेकरून कोरोनाची सध्याची स्थिती आणि बेडची उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती मिळणे सुलभ होईल, अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, नागरिकांपर्यंत पोहचून कोरोनाबाबत जनजागृती करावी.  ऑक्सीजन (Oxygen) बेडची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी,'' अशा सूचना त्यांनी दिल्या. Ajit Pawar warns of strict restrictions if Baramatikars do not control Corona

''काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करतांना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर  प्रशासनाने कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करावी.  सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे,'' असेही त्यांनी सांगितले.

''लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी  नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावा, व कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्रीची चांगल्या प्रतीची खरेदी करावी. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही,  याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी'' असेही ते म्हणाले. Ajit Pawar warns of strict restrictions if Baramatikars do not control Corona

‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी  टाळणे या त्रिसुत्रीवर भर देत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.
Edited By - Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com