'योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगीतली तर आमचे काम सोपे'

'योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगीतली तर आमचे काम सोपे'

लखनौ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात वाद निर्माण झाला होता. यावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगींवर टीका केली आहे. योगींनी जर इतर देवीदेवतांचीही जात सांगितली असती तर आणखी चांगलं झालं असतं, असा टोला त्यांनी लगावला आहे.

अखिलेश पुढे म्हणाले की, योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगितली असती तर चांगलं झालं असतं. त्यामुळं आमचं काम सोप्पं झालं असतं. देवानं त्यांना काय दिलं हेही योगींनी सांगावे, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. भाजपा तिरस्कार निर्माण करणारे आणि फुटीरवादी राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या सर्वांचे उत्तर भाजपाला 2019 मध्ये द्यावे लागेल. समाजवादी पक्षाने नेहमी जातीयवादी पक्षांविरोधात लढा दिला असून आमचा उद्देश हा समृद्धशाली भारताची निर्मिती करणे हाच असल्याचेही त्यांनी म्हटले.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव आणि काँग्रेसच्या चमकदार कामगिरीनंतर सोशल मीडियावर यावरुन मोठी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला होता. दलित म्हटल्यामुळे हनुमान नाराज झाले आणि त्यामुळे भाजपाचा पराभव झाल्याचे सांगत नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले होते.

Web Title: Akhilesh Yadav 5 State Assembly Election 2018 Yogi Adityanath Bhagwan Hanuman Cast

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com