लॉकडाऊनचा शेतकऱ्यांना फटका;कलिंगडच्या शेतात सोडली मेंढरं

जयेश गावंडे
गुरुवार, 20 मे 2021

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या शिवपूर बोर्डी येथील सागर भालतीलक या शेतकऱ्याने आपल्या कलिंगडाच्या शेतात मेंढरं सोडली. मागणी मंदावल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतावर फिरकेनासे झाले आहे.

अकोला : संचारबंदी Curfew , लॉक डाऊन Lock Down, कोरोना व्हायरसची भीती अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कलिंगड Mellons शेती हातची वाया गेली तोंडाशी आलेले पीक शेतात तसेच पडून राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अकोला Akola जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या शिवपूर बोर्डी येथील सागर भालतीलक या शेतकऱ्याने Farmer आपल्या कलिंगडाच्या शेतात मेंढरं सोडली. मागणी मंदावल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतावर फिरकेनासे झाले आहे. Akola Farmer Feeding Ships with Mellons

शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून उपयुक्त ठरणारे कलिंगड मोठ्या प्रमाणावर आले आहे. नेमके विक्री करण्याच्या वेळीच संकट कोसळले. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा राज्यासह Maharashtra अकोला जिल्हा संपूर्ण  ठप्प झाला आहे. जीवघेण्या कोरोना आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापारी ठप्प झाल्याने कवडीमोल किमतीला ही कलिंगडे कोणी घेण्यास तयार नाहीत.

हे देखिल पहा

उठावच नसल्याने हे पीक शेतात तसेच पडून राहिले आहे. पीक सडल्या पेक्षा जनावरांच्या पोटात गेलेलं बरं असे म्हणत अकोला जिल्ह्यातील शिवपूर बोर्डी येथील सागर भालतीलक या युवा शेतकऱ्याने आपल्या दोन एकर कलिंगडाच्या शेतात मेंढरं सोडली. या शेतकऱ्याचे तब्बल चार ते साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सागर प्रमाणे असे अनेक कलिंगड उत्पादक शेतकरी यावर्षी लॉक डाऊन मुळे संकटात सापडले आहेत.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे निधन

लाखो रुपयांची आमदनी देणारे पीक शेतात पडून राहिल्याने शेतकऱ्याचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. फायदा होईल म्हणून शेतकऱ्यांनी कुणी एक एकर कुणी दोन एकर य कोणी चार एकर कलिंगड पिकाची लागवड केली. पीक उत्पादन चांगले आले आहे. मात्र, नेमके विक्री करण्याची वेळ आली आणि हा निसर्गाचा घाला आला. कोरोनामुळे हाहाकार उडाला सर्वत्र मार्केट थंड झाली. Akola Farmer Feeding Ships with Mellons

शेतकरी बांधवांच्या शेतावर येऊन घेऊन जाणारे व्यापारी कवडीमोल किमतीने घेऊ लागले. आठ दहा रुपये किलोने घेणारे चार पाच रूपये किलो मागू लागले आहेत. शेतकरी बांधवांना कलिंगडे तोडायला लावून घेऊन न जाणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. परिणामी या हंगामात शेतऱ्यांना जबर फटका बसला आहे.अशा शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. 

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live