अकोल्यात मुस्लिम तरुणांनी आतापर्यंत केले बाराशेच्यावर अंत्यसंस्कार

Akola Muslim Youths performing Last Rites of Corona Patients
Akola Muslim Youths performing Last Rites of Corona Patients

अकोला : अकोल्यातील Akola मुस्लिम समाजाचे तरुण गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे Corona मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत आहेत. आतापर्यंत या तरुणांनी बाराशेच्या वरती मृतदेहांवर अंत्यसंस्कार Last Rites केले आहे. विशेष म्हणजे मृतदेह कुठल्याही धर्माचा समाजाचा असो हे तरुण त्या- त्या धर्मानुसार विधिवत अंत्यसंस्कार करत आहे.Akola Muslim Youths performing Last Rites of Corona Patients   

अकोल्यात Akola गेल्या वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही अधिक आहे. कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने कोरोनामुळे Corona मृत्यू झालेल्या मृतदेहास अंत्यसंस्कार कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. तोकडी प्रशासकीय व्यवस्था यामुळे शेकडो मृतदेह कित्येक दिवस पडून राहत आहेत. यातच त्या मृतदेहांवर तातडीने अंत्यसंस्कार करणे गरजेचे असते. Akola Muslim Youths performing Last Rites of Corona Patients   

अकोल्यात मुस्लिम Muslim समाजाचा असाच एक ग्रुप समोर आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून हा ग्रुप कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांवर अंत्यसंस्कार करत आहे. अकोल्यातील कच्छी मेमन Kacchi Memon जमात ट्रस्ट गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत या ट्रस्टच्या सदस्यांनी तब्बल बाराशेच्या वर कोरोनामुळे मृत झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहे. अकोल्यातील कच्छी-मेमन जमात ही मुस्लिम संघटना सदैव राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मतेसाठी काम करीत आहे. 

कोरोना संकटात अकोला प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत कोरोनाबाधित रूग्णांवर अंत्यसंस्कार आणि त्यांच्या आरोग्यासाठी ही संघटना झटत आहे. कोरोनाच्या संकटात आतापर्यंत या सेवाभावी तरूणांनी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असलेल्या बाराशेपेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.Akola Muslim Youths performing Last Rites of Corona Patients   

अलिकडेच समाजात, धर्मा-धर्मात फुट पाडणाऱ्या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनासारख्या संकटातही या प्रवृत्तीवर द्वेषाचे विष वेगानं समाजात पसरविण्याचे प्रयत्न करत असतात. मात्र सध्याच्या विद्वेष आणि नकारात्मकतेच्या वाळवंटात अकोल्यातील ही घटना माणुसकीची हिरवळ फुलविणारी म्हणावी लागणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com